A T M ची अफरातफर करून सर्वसामान्य नागरीकांना लुबाडणाऱ्या दोघांना दिवा पोलिसांनी केले अटक…
अमित जाधव - संपादक
ठाणे – दिवा शहरात गेल्या अनेक दिवसापासून ए टी एम ची अफरातफर करून नागरीकांना,ज्येष्ठ माणसांना हेरून त्याच्या बँकेतील सर्व रक्कम ए टी एम ने काढून घेत घोड फसवणूक करून लुबाडत आहे अशा वाढत्या तक्रारीची गंभीर दखल घेत अखेर मुंब्रा पोलिसांनी सतत दिवा शहरात गस्त घालत मोठ्या शिताफीने दुकलीला अटक केली आहे
एच डी एफ सी बँकेत सदर इसम पैसे काढत असताना पैसे न निघाल्यामुळे त्यांनी त्यांच्या पाठीमागील रांगेत उभ्या असलेल्या आरोपीला मदत मागितली असता ए टी एम कार्डची अदलाबदल करून आरोपीने तक्रारदाराच्या ए टी एम मधून ६४७०० रुपये काढून फसवणूक केली असता मुंब्रा पोलिसांनी केली अटक करून अंग झडतीत मोठ्या प्रमाणावर ए टी एम कार्ड मिळाले आहे व जवळ जवळ शेकडो लोकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे त्यामुळे मुंब्रा पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता अधिक चौकशीसाठी सदर आरोपींना तीन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे .
या वेळी मुंब्रा पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी नागरीकांना आवाहन केले की कोणीही आपला ए टी एम पिन नंबर दुसऱ्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीस देऊ नये अथवा शेअर करू नये व याकामी कोणाची मदत घेऊ नये.
वरील तपास मुंब्रा पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खडली दिवा पोलिस टीम करत आहे.