बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

प्रचार वाहनासाठी प्रशासनाची परवानगी आवश्यक,जिल्हा निवडणूक प्रशासन

अमित जाधव - संपादक

 

*ठाणे, दि. 4 (प्रतिनिधि) -* लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनासंदर्भातील सर्व परवाने घेऊनच प्रचारासाठी वाहने वापरण्यात यावीत. परवाने न घेता वाहन वापरल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील असे निर्देश जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिल्या आहेत.
ठाणे जिल्ह्यात 23 भिवंडी, 24 कल्याण आणि 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचा सोशल मिडिया, प्रिंट मिडिया, एलईडी वाहन, प्रचाररथ आदी माध्यमातून प्रचार सुरु झाला आहे.
प्रचार रथ, एलईडी वाहन अथवा फिरत्या वाहनाद्वारे प्रचार करण्यापूर्वी उमेदवारांनी त्यासंबंधीच्या आवश्यक त्या परवाने संबंधित विभागाकडून घ्यावेत. प्रचारादरम्यान वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या बाह्य संरचनेत प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या परवानगी शिवाय कोणतेही फेरबदल करता येणार नाहीत. तसेच अशाप्रकारच्या फेरबदलांकरिता प्रादेशिक परिवहन विभागाकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काची रक्कम संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केली जाईल, याची दक्षता घ्यावी. वाहन परवान्यासोबत वाहनावर कलर कोड नुसार बॅंज लावणे बंधनकारक असेल, या अटींचे पालन संबंधितांनी करावे.

*वाहन परवान्यांसाठीची माहिती*
कार्यक्षेत्र- ठाणे जिल्हा, वाहन परवाना- १.नोंदणीकृत राजकीय पक्ष, २.नोंदणीकृत पक्षाचे जिल्हास्तरीय पदाधिकारी. परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी (लोकसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग- परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे – १.आर.सी. बुक, २.वाहनाचा इन्शुरन्स, ३.वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, ४.टॅक्स भरल्याची पावती, ५.व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, ६.चालकाचा परवाना, ७.पी.यू.सी., ८.वाहनाच्या चारही बाजूचा फोटो.
कार्यक्षेत्र- लोकसभा मतदारसंघ, वाहन परवाना : उमेदवार/उमेदवार प्रतिनिधी- परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी (एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग- परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे – १.आर.सी. बुक, २.वाहनाचा इन्शुरन्स, ३.वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, ४.टॅक्स भरल्याची पावती, ५. व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, ६. चालकाचा परवाना, ७.पी.यू.सी., ८. वाहनाच्या चारही बाजूचा फोटो.
कार्यक्षेत्र- विधानसभा मतदारसंघ, वाहन परवाना- उमेदवार/उमेदवार प्रतिनिधी- परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी (एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग- परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे – १.आर.सी. बुक, २.वाहनाचा इन्शुरन्स, ३.वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, ४.टॅक्स भरल्याची पावती, ५.व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, ६.चालकाचा परवाना, ७.पी.यू.सी., ८.वाहनाच्या चारही बाजूचा फोटो.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वाहनांचा वापर करताना संबंधित उमेदवारांनी भारत निवडणूक आयोगाच्या सूचना, कायदे, निर्देश, मार्गदर्शन तत्वांचे पालन करावे. परवाने न घेता प्रचारासाठी वाहन वापरताना आढळल्यास संबंधितांविरुद्ध आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असे जिल्हा निवडणूक प्रशासनाने कळविले आहे.

००००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे