उत्तर मुंबईत अनिधिकृत लाईट माफिया, पाणी माफिया चोरीचे रॅकेट,मात्र महावितरण विभाग यांचे कारवाई साठी दुर्लक्ष….
अमित जाधव-संपादक
उत्तर मुंबईत अनिधिकृत लाईट माफिया, पाणी माफिया चोरीचे रॅकेट,मात्र महावितरण विभाग यांचे कारवाई साठी दुर्लक्ष….
मुंबई संजय बोर्डे दी १७गुरुवार
उत्तर मुंबई जिल्ह्यातील परिसरातील दहिसर बोरिवली कांदिवली मालाड दिंडोशी या परिसरातील केतकीपाडा, धार खाडी समता नगर जानू पाढा भीम नगर दामू नगर गांधी नगर गौतम नगर, लहू गड सातारा कॅम्प वाल्मिकी चाळ
क्रन्तिनगर अप्पापाडा, जामऋषी सावित्रीबाई फुले नगर, अण्णाभाऊ साठे नगर, आंबेडकर नगरमध्ये मोठया प्रमाणात वनविभागं, परिसर तसेच या डोंगराळ भागात लाईट, व पाणी यांचे मोठया प्रमाणात अनिधिकृत पाणी कनेक्शन चालूं आहे,
वनविभाग परिसरात देखील पाणी कनेक्शन साठी वीज मोठया प्रमाणात चोरली जाते. या संबंधित स्थानिक नागरिकांकडून ऑनलाईन तक्रारी दाखल केल्यानंतर परिस्थिती अजून तशीच आहे, आद्यपि कोणावरीही कारवाई नाही गेल्या काही वर्षापासून किती अनिधिकृत वीज चोरी केली, किती युनिट चा वापर झाला या बाबत महावितरण विभागाने आद्यपि कारवाई केली नसून, संबंधित व्यसाय करणारे ८०% पर प्रांतीय नागरिक आहे. स्थानिक शिवसेना लोकप्रतिनिधी संपर्कात असल्यामुळे यां अनधिकृत व्यसायात देखील लोकप्रतिनिधीचा हात असल्याचा स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.
अनिधकृत वीज चोरी केल्याप्रकरणी सदर संबंधित व्यसायिक धारकावर तात्काळ वीज कायदा कलम १२६ नुसार गुन्हाची नोंद करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
वनविभागामध्ये बरेच अनधिकृत धंदे चालू आहेत मोकळ्या जागेवर झोपड्या पाणी चोरी, वीजचोरी करणे. खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने पत्रकाराने तक्रार केली तर त्याच्या घरावर मारेकरी पाठविले जाणे त्याच्यावर करणे त्यांना धमक्या देणे असे प्रकार दलाल करत असतात.
कोट
वनविभागात राहणारे व जनसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे पत्रकार संजय बोर्डे यांच्या विरोधात मुंबईमध्ये कलम १४४व कडक लॉक डाऊन लागू असताना वीज चोरी , पाणीचोरी करणारे दलाल यांनी ५००ते ६००लोकांचा जमाव खोटी अफवा पसरवून जमा केला होता. वारंवार कुरार पोलीस ठाणे येथे तक्रार करून सहाय्यक पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्त कायदावसुरक्षा,पोलिस उपायुक्त यांना तक्रार करूनही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.नितेश मगर
स्थानीय रहिवाशीआमची नेहमी कारवाई चालू आहे.
आम्ही वायर कटिंग करतो दोषी आढळला तर त्याच्यावर पोलीस केस सुद्दा करतो.आदेश उबाळे
अदाणी विजिलेंस विभागपाणी चोरी बाबत आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. व काही ठिकाणी आम्ही कारवाई सुद्धा केले आहे. यापुढे सुद्धा अजून कारवाई केली जाईल
विनोद सावद
जल अभियंता आर दक्षिण