Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई…..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

दिवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे – ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज दिवा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आले. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.

या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समिती येथील सफिअल्ल्हा चौधरी यांचे तळअधिक पहिल्या मजल्याचे अंदाजे २५०० चौ फूट बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने व कामगाराच्या मदतीने निष्कासित करण्यात आले.सदर बांधकामावर एमआरटीपी दाखल करण्यात आली आहे.तसेच अब्दुल गणी शेख यांचे शिबळी नगर येथील तळअधिक व्याप्त दुसऱ्या मजल्यावरील अंदाजे २७०० चौ.फूट बांधकाम निष्कासित करण्यात आले.

सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त जी.जी. गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (सनियंत्रण व समन्वय) महेश आहेर यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.

#Thanewatch

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे