Breaking
ब्रेकिंग

दिवा प्रभाग हा कोणाच्या बापाची मालमत्ता होऊ देऊ नका,भरलेल्या इमारतीमधील रहिवाशांना बाहेर काढून इमारती पाडणे हे कायद्यात देखिल बसत नाही… जितेंद्र आव्हाड

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

ठाणे महानगरपालिका हद्दीत दिवा शीळ या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. येथील बांधकामे पाडावीत याबद्दल मी आपणांकडे कधीच तक्रार केलेली नाही.

ठाणे महानगरपालिकेतील काही अधिकारी आपले गैरकृत्य बाहेर जाऊ नये, म्हाडा स्कॅम परत उघडला जाऊ नये यासाठी काही इमारती पाडण्याचे प्लॅनिंग करीत आहेत. आपल्याला एवढीच विनंती आहे की, पाडायच्या असतील तर सगळ्याच इमारती पाडा अन्यथा एकही इमारत पाडू देऊ नका. दिवा प्रभाग हा कोणाच्या बापाची मालमत्ता होऊ देऊ नका. ज्यामुळे प्रशासनाचे नाव खराब होते. आज रविवारच्या दिवशी कोणाचीही परवानगी न घेता केवळ त्या इमारतीचा मालक हा आपल्या विरोधात आहे म्हणून ती इमारत पाडण्यासाठी अधिकारी पाठवणं हे कुठल्या कायद्यात बसत?

इमारतीमध्ये लोक राहत आहेत. महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक आहे की, 1 जून ते 31 सप्टेंबर दरम्यान आपल्याला कोणालाही बेघर करता येणार नाही. असं असताना भरलेल्या इमारतीमधील रहिवाशांना बाहेर काढून इमारती पाडणे हे कायद्यात देखिल बसत नाही. त्यामुळे कायद्यात बसत नसेल तर त्याला आम्ही समोर उभे राहून विरोध करु. कायदा तुम्हाला पावसाळ्यात इमारती पाडण्याची परवानगी देत नाही.
डॉ जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे