दिव्यात आर पी आय (आ)गटाच्या वतीने बेतवडे येथे भव्य हळदी कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वास भालेराव यांचे उत्कृष्ट आयोजन,शेकडो महिलांची उपस्थिती…
अमित जाधव - संपादक
दिव्यात आर पी आय (आ)गटाच्या वतीने बेतवडे येथे भव्य हळदी कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन….
ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वास भालेराव यांचे उत्कृष्ट आयोजन,शेकडो महिलांची उपस्थिती…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) केंद्रीय मंत्री मा.रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय महिला अध्यक्षा सीमा ताई आठवले यांच्या निर्देशानुसार दिवा बेतवडे शाखा, ठाणे जिल्हा उप अध्यक्ष श्री.विश्वास भालेराव यांच्या सौजन्याने भोळे चाल मित्र मंडळ आयोजित माता रमाई यांच्या जयंती निमित्त समता महिला बचत गट भव्य हळदी कुंकू समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून अवी अनिल कलामंच यांचे नमन ,स्त्री पत्राने नटलेली गौळण आणि शिवशंभू मर्दानी अखड्यासह ज्वलंत नाट्यकृती नटखट गौळण या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दिव्यातील शेकडो महिलांनी सहभागी दर्शविला.प्रसंगी विश्वास भालेराव ठाणे जिल्हा उप अध्यक्ष, उमेश जाधव दिवा शहर उपाध्यक्ष(आर पी आय),एकनाथ भगत (ओ बी सी आघाडी ठाणे अध्यक्ष),दिनेश पाटील (दिवा शहर अध्यक्ष) प्रकाश कदम,विशाल मनाडे व आदी प्रमुख पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.तसेच समता महिला बचत गट अध्यक्ष आरती उमेश जाधव,उपाध्यक्ष – आशा विश्वास भालेराव,खजिनदार – नयना जाधव,सचिव – पूनम जाधव आदी महिलांनी भव्य दिव्य हळदी कुंकू समारंभ यशस्वीरीत्या पार पाडला.प्रमुख पाहुणे पाहुणे सौ.रिया पवार,सौ.रेश्मा जाधव,सौ.प्रेमकला सिंग,सौ.शीतल दळवी,सौ.मंगल शिंदे व मान्यवर सुरेश जाधव ,नवनीत पाटील,सागर जाधव,मयूर जाधव,महेंद्र नारकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते



