Breaking
ब्रेकिंग

दिवा शहरात क्लस्टरच्या सर्वेक्षणाला सुरुवात ,दिवेकरांना अधिकृत घरे मिळण्याचा मार्ग मोकळा,दिव्याचा होणार कायापालट , भंडार्ली घनकचरा प्रकल्पाला विरोध  करणाऱ्यांचा आता क्लस्टरला विरोध – मा.उप महापौर रमाकांत मढवी ..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

*दिवा शहरात क्लस्टरच्या सर्वेक्षणाला सुरुवात*

*दिवेकरांना अधिकृत घरे मिळण्याचा मार्ग मोकळा*
*दिव्याचा होणार कायापालट*

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रात क्लस्टर योजना सुरू केली असून या योजनेचे ४५ यूआरपी तयार केले असून ठाणे शहरात सहा ठिकाणी क्लस्टर सर्वेक्षणाला सुरुवात केली असून दिवा शहरात देखील सर्वेक्षण सुरू करावे अशी मागणी मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांनी केली होती. फेब्रुवारी महिन्यात दिवा शहरातील क्लस्टर सर्वेक्षणाला मंजूरी मिळाल्यानंतर मार्च महिन्यात निविदा सुद्धा काढण्यात आली. नुकतीच खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिव्यातील क्लस्टर सर्वेक्षणाला तात्काळ सुरुवात केली जाणार असल्याचे दिवावसीयांना सांगितले आणि सदर सर्वेक्षणाला सुरुवात झाल्याचे रमाकांत मढवी यांनी सांगितले.
आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे दिवा शहरप्रमुख मा.उपमहापौर *रमाकांत मढवी*, क्लस्टर योजनेचे सर्वेक्षण विभागाचे प्रमुख सहाय्यक आयुक्त *प्रितम पाटील* व सहाय्यक आयुक्त *अक्षय गडदे* यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिवा विभागात क्लस्टर सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात रहिवाशांच्या घरांना व व्यावसायिक गाळ्यांना क्रमांक टाकण्यात येतील व त्यानंतर नागरिकांकडून कागदपत्र मागवली जातील असे सर्वेक्षण करणाऱ्या प्रमुखांनी सांगितले. दिवा शहरातील नागरिकांनी सर्वेक्षण करणाऱ्या टीमला सहकार्य करावे अशी विनंती सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील यांनी केली. यावेळी मा.नगरसेवक अमर पाटील, अँड.आदेश भगत, विभागप्रमुख उमेश भगत, निलेश पाटील, भालचंद्र भगत, गुरुनाथ पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

भंडार्ली घनकचरा प्रकल्पाला विरोध  करणाऱ्यांचा आता क्लस्टरला विरोध – 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिवेकरांना दिलेल्या शब्दानुसार लवकरच दिव्यातील डम्पिंग बंद होणारच आहे शिवाय क्लस्टर योजना देखील सुरू झाली आहे.
भंडार्ली प्रकल्प झाल्यास दिव्यातील डम्पिंग बंद होणार म्हणून भंडार्ली प्रकल्पला विरोध करणारे आता क्लस्टरला विरोध करून दिवेकरांच्या विकासाच्या आड येण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांकडून क्लस्टर बाबत जाणून बुजून उठविण्यात येणाऱ्या अफवांवर दिवेकरांनी विश्वास ठेवू नये अस आव्हान रमाकांत मढवी यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे