Breaking
ब्रेकिंग

सर्व लोकल गाड्या एसी लोकलमध्ये रुपांतर करण्याची योजना, दरवाजात उभे राहून होणारे वाढते अपघात रोखण्यात होईल मदत…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. दररोज लाखो प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. पण अलीकडच्या काळात लोकलमधील गर्दी वाढत चालली आहे. गर्दी वाढल्यामुळं प्रवाशांना लोकलमध्ये चढायलादेखील मिळत नाही. तर, कित्येकदा प्रवाशांना दरवाज लटकतच प्रवास करावा लागतो. या सगळ्या समस्येवर सरकार लवकरच तोडगा काढणार आहे. सर्व लोकल गाड्या एसी लोकलमध्ये रुपांतर करण्याची योजना चर्चेत आली आहे.

महाराष्ट्र सरकारकडून लवकरच सर्व लोकलचे रुपांतर एसी लोकलमध्ये करण्यात येणार आहे. मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी प्रशासनाकडून हा प्रयत्न करण्यात येणार आहे. उन्हाळ्याच्या काळात लोकलमधील गर्दीमुळं प्रवाशांना खूप त्रास होतो. गर्दी आणि घामाच्या धाराने मुंबईकर हैराण होतात. एसी लोकलमुळं प्रवाशांचा त्रास वाचणार असून त्यांचा प्रवासही अधिक आरामदायी होणार आहे. एसी लोकलमुळं रेल्वेचे नेटवर्कमध्ये ही आधुनिकीकरण होईल. एसी लोकलमुळं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील सुटेल. गर्दीमुळं व दरवाजात उभं राहिल्यामुळं अपघाताच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. धावत्या लोकलमधून होणारे प्रवाशांचे मृत्यू हा गंभीर प्रश्न होता. मात्र, एसी लोकलमुळं हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. एसी लोकलचे दरवाजे बंद असतात त्यामुळं नागरिकांचा प्रवास सुरक्षित होऊ शकतात.

दरम्यान, मुंबई लोकलमधून दररोज 7.5 लाख नागरिक प्रवास करतात. जगातील सर्वात जास्त व्यस्त असलेले उपनगरीय रेल्वेचे जाळे आहे. मुंबईल लोकलचे जाळे 390 किमीपर्यंत पसरले आहेत. यात तिन प्रमुख मार्गिका आहेत. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्ग. या तिन्ही मार्गावर लोकल धावतात

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे