दिव्यात ठाकरे गटाच्या एका बड्या पदाधिकाऱ्यावर खोटे आरोप केल्या प्रकरणी गुन्हा दाखल…
अमित जाधव - संपादक
शिवसेना दिवा उपशहरप्रमुख अँड.आदेश भगत यांच्यावर उबाठा गटाचे पदाधिकारी रोहिदास मुंडे यांनी खोटे आरोप केल्यामुळे आदेश भगत यांच्या तक्रारीवरून रोहिदास मुंडे यांच्या विरोधात मुंब्रा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिवा स्टेशन पूर्व परिसरात फेरीवाले व बेशिस्त रिक्षाचालक यामुळे येथे नेहमीच होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या विरोधात शिवसेना उपशहरप्रमुख अँड.आदेश भगत यांनी ठाणे महानगर पालिका सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांना निवेदन दिले होते. उबाठा गटाचे रोहिदास मुंडे यांनी आज एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आदेश भगत यांच्यावर खोटे आरोप केले आहेत असे पोलीस तक्रारी नुसार समजले असून यावेळी आपला काही संबंध नसताना आपल्यावर खोटे आरोप करण्यात आले असल्याने अँड आदेश भगत यांनी मुंब्रा पोलिस स्टेशन मध्ये रोहिदास मुंडे यांच्या विरोधात तक्रार दिली. सोशल मीडियावर टाकलेला व्हिडिओ तपासून रोहिदास मुंडे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३५६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



