हाळ खुर्द गावातील मुस्लिम व आदिवासी समाजबांधवांना दफनभूमी उपलब्ध करून द्या!अ खिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (ABJF), पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली, रायगड संघर्ष समिती व सुन्नी शाफिया मदिना मस्जिद ट्रस्टची मागणी…
अमित जाधव-संपादक
हाळ खुर्द गावातील मुस्लिम व आदिवासी समाजबांधवांना दफनभूमी उपलब्ध करून द्या!अ
खिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (ABJF), पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली, रायगड संघर्ष समिती व सुन्नी शाफिया मदिना मस्जिद ट्रस्टची मागणी
खालापुर (जि. रायगड) / खलील सुर्वे :- हाळ खुर्द गावात मुस्लिम समाजाची तीन ते चार हजारांहून अधिक लोकसंख्या असून गेल्या 75 वर्षात या गावाला हक्काची दफनभूमी (कब्रस्तान) नाही. या गावातील नागरिकांना मयत (मृतदेह) दफन करण्यासाठी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या खोपोली नगर परिषद हद्दीतील कब्रस्तानात जावे लागते. खोपोली शहराची वाढती लोकसंख्या पाहता हे कब्रस्तान त्यांनाच अपुरे पडत आहे अशा परिस्थितीत हाळ खुर्द येथील मुस्लिम व आदिवासी समाजबांधवांना दफनभूमी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (ABJF), पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली (भारत), रायगड संघर्ष समिती व सुन्नी शाफिया मदिना मस्जिद ट्रस्टने केली आहे.
दरम्यान, संघटनेच्या वतीने खालापुर तहसीलदार अय्युब तांबोळी यांना मुस्लिम कब्रस्तान व आदिवासी स्मशानभूमीबाबत आज (दि. 20) निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक तथा रायगड संघर्ष समिती मुख्य संयोजक जेष्ठ पत्रकार पैलवान हनुमंतराव ओव्हाळ, हाळ खुर्द गावाचे सरपंच लता पवार, उपसरपंच आजिम करजीकर, ग्राम पंचायत सदस्य तथा सुन्नी शाफिया मदिना मस्जिद ट्रस्टी हानिफ करजीकर, लेखणीक नरेंद्र धारणे, अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्य महासचिव तथा पोलीस मित्र संघटना रायगड जिल्हा महासचिव खलील सुर्वे, अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्य सचिव नरेश जाधव आदी उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले की, हाळ खुर्द गावात मुस्लिम समाजाची तीन ते चार हजारांहून अधिक लोकसंख्या असून गेली 75 वर्ष या गावाला हक्कांची दफनभूमी (मुस्लिम कब्रस्तान) नाही. या गावातील नागरिकांना मयत दफन करण्यासाठी १ किलोमीटर अंतरावर असलेल्या खोपोली नगर परिषद हद्दीतील कब्रस्तानात जावे लागते. खोपोली शहराची लोकसंख्या पाहता हे कब्रस्तान त्यांनाच अपुरे पडत आहे. अशा परिस्थितीत हाळ खुर्द येथे स्वतंत्र कब्रस्तान होणे महत्वाचे आहे. संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना एका गावाला दफनभूमी सुध्दा नसावी, ही खरंच खेदजनक बाब आहे. गावाच्या शेजारी तसेच गावाच्या मालकीची अनेक एकर शासकीय जागा असताना त्यातून दोन एकर जागा कब्रस्तानासाठी उपलब्ध करून द्यावी. तसेच आदिवासी समाजबांधवांना देखील 1 एकर जागा स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, या निवेदनाच्या प्रती केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री, महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अल्पसंख्यांक मंत्री, कोकण विभागीय आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी, कर्जत प्रातांधिकारी आदींना पाठविण्यात आल्या आहेत.



