Breaking
ब्रेकिंग

दिवा शीळ येथे कबुतराची सुटका करत असताना अग्निशामक दलाचे दोन जवानपैकी एकाचा मृत्यू तर एक जन जखमी..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4
आज दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी १७:०० वाजताच्या सुमारास सुदामा रेसिडेन्सी बाजूला, खर्डीगाव, दिवा – शीळ रोड, दिवा (पू.), ठाणे याठिकाणी  टोरंट पॉवर कंपनीच्या ओव्हरहेड वायरवर कबुतर अडकल्याची वर्दी प्राप्त झाल्यानंतर दिवा बीट अग्निशमन केंद्राचे जवान ०१-रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी पोहचले. दरम्यान कबुतराची सुटका करत असताना अग्निशमन दलाच्या ०२- जवानांना ओव्हरहेड वायरचा विजेचा धक्का बसल्याने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले असता  उत्सव पाटील *(पु / २८ वर्षे / राहणार – आगासन गाव, दिवा) यांचा मृत्यू झाला असल्याचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले.
*२)* श्री. आझाद पाटील *(पु / २९ वर्षे / राहणार – वाडा, पालघर) यांना हाताला व छातीला भाजले आहे.
*सद्यस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे उप आयुक्त श्री. दिनेश तायडे सो., मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. झळके सो., अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी उपस्थित आहेत.
3.7/5 - (3 votes)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे