Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

निर्बंध नकोत, तर मास्क वापरा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन रुग्णसंख्या वाढल्यास प्रसंगी कठोर निर्णय घेणार…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 9

निर्बंध नकोत, तर मुखपट्टी वापरा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन
रुग्णसंख्या वाढल्यास प्रसंगी कठोर निर्णय घेणार

मुंबई : राज्यात करोना पुन्हा डोके वर काढत असून, दैनंदिन रुग्णांची संख्या वाढत आहे. पुढील १५ दिवस महत्त्वाचे असून, शासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहे. पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी मुखपट्टीचा वापर करावा, स्वयंशिस्त पाळावी, लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना उद्देशून केले. रुग्णसंख्या वाढल्यास प्रसंगी कठोर निर्णय घेण्याचा इशाराही ठाकरे यांनी दिला.राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोना बाधितांचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: मुंबई, ठाणे, पुणे अशा महानगरांमध्ये दैनंदिन बाधितांचा आकडा झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेसह सरकारचीही चिंता वाढली आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी तातडीने करोना नियंत्रण कृती गटाशी चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन..

* ताप, सर्दी, घशात दुखत असल्यास तत्काळ करोना चाचणी करुन घ्या.

* गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी आवर्जून वापरा.

* बारा ते अठरा वयोगटातील लसीकरण वाढवा.

* ज्येष्ठ, सहव्याधी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, वर्धक मात्रा घ्यावी.

दीड महिन्यात सात पट..

राज्यात पुन्हा एकदा करोनाचा संसर्ग वाढू लागला असून गेल्या दीड महिन्यात सात पटीने बाधितांची वाढ झाली आहे. करोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी सज्जतेचा आदेश मुख्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेला दिला.

पुढील १५ दिवस महत्त्वाचे..

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार करोना आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन पुढील पंधरा दिवस परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे