ब्रेकिंग लखनऊ-मुंबई या चालत्या पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्कार व लूट…….
अमित जाधव-संपादक
कसारा, ता 9 ऑक्टो, इगतपुरी- कसारा दरम्यान काल रात्री आठच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरांनी अचानक लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रवेश केला. यावेळी दरोडेखोरांनी 15 ते 20 प्रवाशांना लुटलं. आरोपींनी प्रवाशांकडून रोख रक्कमेसह किमती मुद्देमाल हिसकावून घेतला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण पसरलं होतं. प्रवाशांना लुटल्यानंतर दरोडेखोरांची नजर रेल्वेतून प्रवास करणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर पडली.
यानंतर नराधमांनी 20 वर्षीय तरुणीसोबत जबरदस्ती करत धावत्या ट्रेनमध्येच तिच्यावर बलात्कार केला. या संतापजन घटनेनंतर नराधमांनी घटनास्थळावरून पळ काढला. संबंधित संतापजनक प्रकार इगतपुरी ते कसारा रेल्वे स्थानकांदरम्यान घडला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कल्याण जीआरपीने दरोडा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. तसेच अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर, रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.



