दिव्यात सम्यक समता मंडळ (रजि.) व महिला मंडळ च्या वतीने६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अनोखे अभिवादन..
अमित जाधव - संपादक
प्रतिनिधी – सम्यक समता मंडळ (रजि.) व महिला मंडळ यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६७ वा महापरिनिर्वाण दिन दातिवली तलाव , दिवा (पूर्व) याठिकाणी दिनांक ५ डिसेंबर २०२३ व ६ डिसेंबर २०२३ रोजी शेकडो आंबेडकरी अनुयायी आणि समस्त बहुजन भारतीय बांधवांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळेस दिवा शहराच्या मध्यवर्ती चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि समस्त बोद्ध बांधव आणि बहुजन बांधव यांच्या हक्काचे बुद्ध विहार अथवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता न्याय भवन (स्मारक सभागृह) निर्माण व्हावे याकरिता भव्य स्वाक्षरी अभियान – २०२३ राबविण्यात आले. सदरच्या अभियानाला हजारो आंबेडकरी अनुयायी आणि समस्त भारतीय बहुजन बांधव यांनी उत्स्फूर्त आणि उदंड असा प्रतिसाद दिला.

सदर कार्यक्रमास क्रियाशील माजी नगरसेवक आदरणीय आयु. दिपक नामदेव जाधव यांचे अतिशय अमूल्य मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. तसेच सदर कार्यक्रमास मंडळाचे कार्यकर्ते, सभासद, सल्लागार, महिला कार्यकर्त्या आणि सदस्या आणि दिवा शहरातील धम्मबांधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति आपले कर्तव्य आणि जबाबदारी सद्भावनापूर्वक पार पाडले.
महापरिनिर्वाण दिनाची सुरुवात दिनांक ५ डिसेंबर २०२३ रोजी रात्रौ ११ वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पांजली आणि राष्ट्रनिर्माते बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण दानशूर व्यक्तिमत्व सन्मानीय आयु. दिनेश पाटील साहेब ( कार्याध्यक्ष , संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ , दिवा शहर) यांच्या हस्ते करण्यात आले. तर मेणबत्ती प्रज्वलन आंबेडकरी समाजाचे एकहाती नेतृत्व करणारे सन्मानीय आयु. एकनाथ भगत साहेब (अध्यक्ष , संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ- दिवा शहर) यांच्या हस्ते काण्यात आले, पुष्पचक्र अर्पण सुप्रसिद्ध युवा कार्यकर्ते आयु. बालाजी कदम साहेब (प्रमुख संघटक, संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ- दिवा शहर) आणि आयु. राहुल जोगदंड , आयु.गंगाधर गायकवाड, आयु. बापू भोसले, आयु. डी. के. खरात, आयु. प्रभाकर कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच अगरबत्ती आणि पुष्प अर्पण आयुनी . शीला (माई) त्रिभुवने (महिला अध्यक्ष , रिपाई) तसेच आयुनी . रुपाली पगारे व आयुनी. पूनम टाक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सम्यक समता महिला मंडळाच्या अध्यक्षा आयुनी. अनुष्का अडसुळे, माजी अध्यक्षा आयुनी. अनुसया बोर्डे , आयुनी. रेखा अडसुळे, अंजली आवाडे, रसिका जाधव, संगीता कांबळे, मेघा कासारे, संध्या न्यायनीत, रोशनी जाधव, मारुती डहाणे , चंद्रभान भादवे , जयेश जाधव, अविनाश गायकवाड, भास्कर चव्हाण यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्मानीय आयु. अमोल कोळेकर साहेब, आयु. साळूंके साहेब व आयु. राठोड साहेब यांनी देखील महामानवाला अभिवादन केले. तदनंतर सम्यक समता मंडळाचे महासचिव आणि बोद्ध उपासक आयु. नितीन रिंगनेकर यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून कार्यक्रमाचे विधी संचालन आणि सूत्रसंचालन केले. सम्यक समता मंडळाचे अध्यक्ष आयु. अभिषेक अशोक जाधव यांनी अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति संकल्प आणि प्रतिज्ञा संपूर्ण जनसमुदायाकडून म्हणवून घेतली. अभिवादन कार्यक्रमच्या समाप्ती नंतर मेणबत्ती शांतता रैली (अभिवादन कॅण्डल मार्च) ला सुरुवात झाली. दातिवली तलाव ते सिद्धार्थ बुद्ध विहार – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – दिवा शीळ रोड मार्गे – दिवा स्टेशन – साबे रोड मार्गे जय भीम स्तंभ येथे शांतता रैलीची सांगता करण्यात आली. दिव्यातील तमाम भीम सैनिकांनी शांतता रैलीत सहभागी होत रात्रौ १२ च्या दरम्यान महामानवाला सामूहिक अभिवादन केले.

तसेच महापरिनिर्वाण दिनानिमित्त दातिवली तलाव येथे बनवण्यात आलेले तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिवादन स्थळ येथे असंख्य भीम सैनिक तसेच प्रतिष्ठित नागरिक आणि समस्त भारतीय बांधव यांनी अभिवादन केले.
अभिवादन कार्यक्रमाचा समारोप करताना युवा वक्ते आयु. संभाजी कदम, संयुक्त जयंती उत्सव मंडळाचे महासचिव आयु. विजय पवार तसेच रिपाई (आंबेडकर) या पक्षाचे कार्यकर्ते आयु. सुदेश पवार यांनी अभिवादन पर अतिशय परखड विचार मांडले. तसेच सम्यक समता मंडळाचे अध्यक्ष आयु. अभिषेक अशोक जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात, अस्पृश्य समाजाला माणूस असूनही माणसासारखी वागणूक न देता जनावरांपेक्षा हि हीन वागणूक दिली जात होती. मनुष्याच्या जगण्यासाठी अन्न , वस्त्र आणि निवारा ह्या प्राथमिक गरजा खूप आवश्यक आहेत परंतु आपल्या समाजाला पाणी प्राशन करण्याचाही अधिकार नव्हता, तसेच आपण सर्व मूलभूत अधिकारापासून वंचित होतो, आपल्या स्पर्शाचा , सावलीचा विटाळ होता. त्यावेळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे २० मार्च १९२७ रोजी चवदार तळे सत्याग्रह केला,
आणि घोषणा केली, हा संगर केवळ पाण्यासाठी नसून तो मानवी मूलभूत हक्क आणि अधिकारांसाठी आहे. आणि त्यापुढे जाऊन असे सांगितले.
जागृतीचा अग्नी अखंडित पणे तेवत ठेवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयांसह जगातील सर्वात मोठे धर्मांतर (धम्मदीक्षा) घडवून आणले. आणि ज्या समाजाला हिन लेखले जात होते, त्या समाजाला बोद्ध धम्माच्या रूपाने ऊर्जा दिली. आपल्या भारत देशात आजही लोकशाहीची पाळेमुळे टिकून आहेत, शाबूत आहेत. समाजात समता प्रस्थापित आहे. सर्वाना मताचा अधिकार आहे. सर्वाना संधीची समानता आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत, जात, धर्म, लिंग, वंश, वर्ग, प्रांत याआधारे भेद केला तर तो सामाजिक अपराध आहे. आजचा आधुनिक भारत जगात ताठ मानेने उभा आहे त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे खूप मोठे योगदान आहे. या भारत देशातील सर्व नागरिकांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनंत उपकार आहेत, आणि ते कधीच फिटणार नाहीत. त्यामुळे त्या उत्तरदायित्वातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा दिवा शहराच्या मध्यवर्ती चौकात बसवण्यात यावा तसेच बोद्ध समाज आणि समस्त बहुजन समाज यांच्या हक्काचे बुद्ध विहार अथवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार आणि कार्य तळागाळातील जन सामान्य लोकांपर्यंत पोहचावे याकरिता सामाजिक समता न्याय भवन (स्मारक सभागृह) शासकीय योजनेतून पूर्ण होण्याकरिता सर्व समाजाने एकजुटीने प्रयत्न करणे आणि पाठपुरावा करणे अत्यंत महत्वाचे असून तेच खरे महामानवाला अभिवादन ठरेल असे आपले विचार त्यांनी मांडले व उपस्थितांना भव्य स्वाक्षरी अभियानाच्या पुढील यशस्वी वाटचालीस बहुसंख्येने सहकार्य आणि प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले. यानंतर आदरणीय माजी नगरसेवक आयु. दिपक जाधव यांच्या मार्गदर्शनाने रात्रौ. ९ वाजता अभिवादन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष :- अभिषेक अशोक जाधव, महासचिव :- आयु. नितीन रिगणेकर , उपाध्यक्ष- आयु. संजय कांबळे, खजिनदार आयु. सतीश कळासरे, हिशोब तपासनीस – आयु. सुशील धनावडे, सहसचिव – आयु. सुशांत अडसुळे , आयु. प्रमोद पाटणे, कार्याध्यक्ष – आयु. मंगेश कदम, आयु. सुमित पवार, आयु. सागर वालीकर , आयु. मारुती डहाणे, आयु. मिलिंद कदम, आयु. चंद्रसेन जाधव, आयु.नितीन आवाडे,आयु. देवेंद्र बनसोडे, आयु. भास्कर चव्हाण, आयु. अविनाश गायकवाड, आयु. बाळू कांबळे तसेच महिला कार्यकर्त्या अध्यक्षा :-आयुनी. अनुष्का अडसुळे, सचिव- आयुनी. विशाखा हाटे , उपाध्यक्ष अंजली आवाडे, गीता भालेराव, रसिका जाधव, अलका टिळक, वंदना जाधव, कविता सोनावणे, सुवर्णा डहाणे, रोशनी जाधव, मेघा कासारे, संध्या न्यायनीत, संजीवनी जाधव, दीक्षा पवार , विनया सोगळे, अंकिता कदम, सीमा डहाणे , दिपाली पवार, निशा जाधव , संगीता कांबळे रोहिणी कदम , कविता शिरसाठ, माजी अध्यक्षा आयुनी. अनुसया बोर्डे , रेखा अडसुळे आदी महिला आणि पुरुष कार्यकर्ते यांनी सदभावना पूर्वक आपली जबादारी आणि कर्तव्य महामानवाच्या प्रति पार पाडले.



