ठाकरेंच्या रणरागिणी विद्यार्थ्याना निकृष्ट दर्जाचे जेवण देणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी दिवा प्रभाग समितीवर धडकल्या…
अमित जाधव - संपादक
दिवा शहरातील महापालिकांच्या शाळामध्ये दिले जाणारे जेवण हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत पालकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील माजी आमदार माननीय श्री सुभाषजी भोईर यांच्या आदेशाने दिवा शहर प्रमुख श्री.सचिन राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा शहर समन्व्यक सौ. प्रियांका नितीन सावंत, आणि दिवा शहर उप शहर संघटिका सौ.स्मिता संभाजी जाधव ह्यांना संपर्क केला.
आणि ह्या रणरागिणी ताबडतोब पालकांसोबत जेवण पुरवठा करणाऱ्या ठिकाणी धडक दिली.
सौ. प्रियांका नितीन सावंत आणि सौ.स्मिता संभाजी जाधव ह्यांनी पालकांसोबत जाऊन जेवण पुरवठादाराला जाब विचारत निकृष्ट दर्जाचे जेवण लहान मुलांना पुरवून त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ठेकेदारावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी यावेळी पालकांसोबत सौ.प्रियांका नितीन सावंत आणि सौ. स्मिता संभाजी जाधव ह्यांनी केली.
आणि ह्यापुढे त्यांच्याकडून त्यांचा ठेका काढून चांगल्या ठेकेदाराला द्यावा अशी मागणी सौ. प्रियांका नितीन सावंत आणि सौ.स्मिता संभाजी जाधव ह्यांनी केली.
जर आमच्या मुलांना असेच निकृष्ट जेवण मिळणार असेल तर असे जेवण आमच्या मुलांना नको.अशी भूमिका पालकांनी मांडली. सोबत उप शाखा संघटिका सौ.श्रावणी कदम, शाखा प्रमुख श्री.संतोष कदम, आणि
पदाधिकारी शिवसैनिक, उपस्थित होते..
जेवण अतिशय निकृष्ट दर्जाचे असून दिव्यातील साईनाथ नगर येथे एका गाळ्यात हे जेवण बनवत होते.जेवणाला लागणारे साहित्य हे निकृष्ट दर्ज्याचे असून जेवणाच्या वापरात येणारे पाणी सुद्धा अशुद्ध आहे. दिव्यातील लहान मुलांच्या आयुष्यशाशी खेळ चालू आहे.
आरोग्य खात्याला विनंती आहे की ह्यांच्या वर कडक कारवाई करावी.सौ. प्रियांका नितीन सावंत,दिवा शहर समन्व्यक,सौ.स्मिता संभाजी जाधव,दिवा उप शहर संघटिका,सौ.श्रावणी संतोष कदम,दिवा उपशाखा संघटिका,संतोष कदम दिवा उपशाखाप्रमुख आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते



