Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी,व्हीजे एनटी) आरक्षणासाठी घटित केलेल्या समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषित…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 9

ठाणे : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसो , व्हीजे एनटी) आरक्षण देण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग घटित केला आहे.

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे.

या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आयोगातर्फे निवेदन करण्यात आले आहे.

यासाठी ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा. कोकण विभागाकरिता समर्पित आयोगाचा भेटीचा कार्यक्रम २५ मे, २०२२ वार बुधवार, रोजी दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन येथे आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे