भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त , प्रसिद्ध जैश्ट पत्रकार व छायाचित्रकार सुभाष जैन यांचे उत्कृष्ट लेखन…
विश्वहितंकर श्री १००८ भगवान महावीर स्वामी
भगवान महावीर स्वामींचा जन्म इसवी सन पूर्व ५९९ मध्ये शुक्ल त्रयोदशीला ज्ञातृवंशात, क्षत्रिय कुलात वैशाली नगरीत कुंडल ग्राम येथे झाला.भ.महावीर ३० वर्षाचे असतांना राज वैभव त्यागून दीक्षा घेतली. बारा वर्षे त्यांनी कठोर तपश्चर्या केली. ४२व्या वर्षी अखंड मौन व्रत केले. त्यामुळे त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. मानवाच्या कल्याणासाठी सम्यक दृष्टी व सम्यकज्ञान देण्यासाठी भारत भर पदयात्रा सुरू केली.
महावीरांनी जगाला शिकवण दिली जगा आणि जगू द्या संदेश दिला आहे. भुकेलेल्या अन्न दान,आजारी माणसाला औषध दान, अज्ञानाला ज्ञानदान, पतितांची सेवा. मानवाला जगण्याचा अधिकार आहे तसाच सर्वांना जगण्याचा अधिकार आहे. अहिंसा परमो धर्म आहे.
अहिंसामध्ये सर्वांचे हित सामावलेले आहे.
महात्मा गांधींनी सुद्धा देशाला स्वातंत्र्य मिळवून अहिंसा मार्गाचा वापर केला. अडीच हजार वर्षे उलटूनही भगवान महावीरांच्या संदेशाची, शिकवणीची आजही जगाला आवश्यकता आहे.
जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर ऋषभदेव हे आहे. त्यांना आदिनाथ नावाने सुद्धा आळखतात.त्यानंतर २३ तीर्थंकर झाले. त्यांची नावे अजितस्वामी,संभवस्वामी,अभिनंदनस्वामी, सुमतीस्वामी,पद्मप्रभु स्वामी ,सुपार्वश्व स्वामी, चंद्रनाथ स्वामी, पुष्पदंतल स्वामी,शीतल स्वामी,श्रेयांस स्वामी, वासुपुज्य स्वामी , विमलनाथ स्वामी ,अनंतनाथ स्वामी, धर्मनाथ स्वामी, शांतीनाथ स्वामी,कुंथुनाथ स्वामी, अरहनाथ स्वामी,मल्लीनाथ स्वामी,मुनीसुव्रत स्वामी,नमिनाथ स्वामी,
नेमिनाथ स्वामी,तेविसावे पार्श्वनाथस्वामी, २४वे महावीरस्वामी तिर्थंकर.
भगवान महावीरांना वीर,अतीवीर,सन्मति, वर्धमान नावानेही ओळखतात. पावापुरी येथून ते 72 व्या वर्षी मोक्षाला गेले.
महावीर यांच्या आईचे नाव त्रिशला देवी होते. जगाच्या इतिहासात पहिला धर्म जैन धर्माने अहिंसा तत्वाचे वरदान दिले आहे. सर्वप्रथम जैन धर्मानेअहिंसेचा पुरस्कार केला. जगात अहिंसा हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. अहिंसा धर्म जगाला तारणारा आहे.भ. महावीरांनी सुमारे २६०० वर्षापूर्वी अहिंसेचे महत्व सांगितले. माणसाला जगण्यासाठी प्राणवायू लागतो तसेच जगात सुख-शांती नांदण्यासाठी अहिंसा पालन करणे योग्य ठरेल.
भ.महावीरांनी दया, क्षमा, शांतीचा महान संदेशं जगाला दिला.भगवान महावीर वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध होते. जगात शाकाहार पाळणारा सर्व प्रथम जैन धर्म आहे.
…… आणि उन्मत्त हत्ती शांत झाला
राजा सिद्धार्थ यांचे शाळेत शेकडो हत्ती होते. एके दिवशी त्यांच्यात चारा खाण्यावरून भांडण लागले.एका हत्तीने अनेक वृक्ष उपटून फेकले समोर येईल त्याला पायदळी तुडवीत होता. भगवान महावीर यांना हे कळताच ते त्याच्या शोधात निघाले भगवान महावीरांकडे तो वेगाने चालून आला पण भगवान महावीरांच्या तपसामर्थ्याने उपदेशाने तो शांत झाला. गेल्या जन्मी च्या पापकृत्यामुळे तुझा जन्म पशुयोनीत झाला आहे. आता तरी पाप करणे सोडून दे. नरकात जाऊ नकोस आणि उन्मत्त झालेला हत्ती शांत झाला. अशा भगवान महावीरांच्या अनेक कथा आहेत.
-संकलन:सुभाष शांताराम जैन.ठाणे.
जेष्ठ पत्रकार, कवी, लेखक, छायाचित्रकार, फोटो जर्नालिस्ट, सामाजिक कार्यकर्ता.
साईनाथ सोसायटी,वर्तक नगर, ठाणे
मोबाईल 9821821885
व्हाट्सअप 8779348256
subhashsjain@yahoo.com



