Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

पावसामुळे अडचण, मुंबई ,ठाणे,नवी मुंबई,वसई विरार, निवडणुका अक्टोबर मध्ये होण्याची शक्यता-सुप्रीम कोर्ट 

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*पावसामुळे अडचण, मुंबई ,ठाणे,नवी मुंबई,वसई विरार, निवडणुका अक्टोबर मध्ये होण्याची शक्यता-सुप्रीम कोर्ट 

राज्यातील अनेक जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या कार्यकाळ संपलेला आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन निवडणुका लांबवणीवर पडल्या होत्या. त्याच दरम्यान काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबतच्या याचिकेवर सुनावणी देताना राज्य निवडणूक आयोगाला राज्यातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम तातडीने जाहीर करण्याची सूचना केल्या. मात्र, त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने कोर्टात धाव घेत निवडणुका पावसाळ्यानंतर घेण्यात याव्यात अशी मागणी केली होती.
सुप्रीम कोर्टाने म्हटलं, ज्या ठिकाणी पाऊस कमी असतो अशा ठिकाणी निवडणुका थांबवण्याची काय गरज आहे? जिल्हानिहाय आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम तयार करावा. ज्या ठिकाणी जास्त पाऊस असतो उदाहरणार्थ कोकण, मुंबई सारख्या भागात आम्ही निवडणूक आयोगाची पावसामुळे होणारी अडचण आम्ही समजू शकतो. या ठिकाणी पावसाळ्यानंतर निवडणुका घेऊ शकतो. त्यानुसार निवडणुकांचा कार्यक्रम तयार करावा. त्यामुळे आता मुंबईसह एमएमआरडीए क्षेत्रात निवडणुका या पावसाळ्यानंतर होण्याची दगाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार या महानगरपालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. कारण, या भागात जून, जुलै, ऑगस्ट या कालावधीत पावसाचे प्रमाण अधिक असते. तर मराठवाडा आणि विदर्भात जून-जुलैमध्ये फार पाऊस नसतो त्यामुळे या भागातील जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे