दिव्यात काळूबाई मित्र मंडळ यंदाचा शारदीय नवरात्रौत्सव मोठया उत्साहात साजरा.. जयेंद्र म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भव्य रक्तदान शिबिर संपन्न…
अमित जाधव - संपादक
ठाणे -दिव्यातील काळूबाई मित्र मंडळ आयोजित शारदीय नवरात्रौत्सव मोठया उत्साहात साजरा करत आहे. कला, क्रीडा,शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमात भर देत यंदा नवव्या वर्षी ही मंडळाने घौड दौड सुरू ठेवत सुदंर अशा देवीच्या मूर्तीची स्थापना करून नवरात्र उत्सवाचे आयोजन केले आहे.
काळूबाई मित्र मंडळ चे जयेंद्र म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाने सामाजिक एकोपा जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते दिव्यातील शेकडो नागरिकांनी यावेळी रक्तदान करत रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान या उवक्ती प्रमाणे उपक्रम यशस्वी केला.
नऊ दिवस येथे भव्य रास गरबा खेळला जात असून शेकडो नागरिक ,महीला ,मुली यात सहभागी होत आहेत प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून महिला व मुलींच्या सुरक्षेची विशेष काळजी घेत रास गरब्याचे आयोजन होत आहे तसेच आठव्या दिवशी भव्य सत्यनारायण महापूजा व भांडाऱ्यात सहभागी होत प्रभागातील शेकडो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दुसऱ्या च्या पुर्व संध्येला मोठया भक्तिभावाने देवीची विसर्जन मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात देवी चां निरोप घेतला जातो असे यावेळी मंडळाचे अध्यक्ष जयेद्र म्हात्रे यांनी बोलताना स्पष्ट केले.
प्रसगी शेखर चौधरी,महेश कुंभार,नितीन जुंजम तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी अथक परिश्रम घेत उपक्रम यशस्वी करतात त्यांचे ही आभार मानून असे म्हात्रे यांनी यावेळी सांगितले



