दिव्यातील ठाकरे गटाच्या महिला उप् शहर् संघटक योगिता नाईक यांचे दातीवली येथील फाटक जवळील रस्ता डांबरीकरणासाठी रेल्वे अधिकारी यानां निवेदन……
अमित जाधव - संपादक
दिव्यातील ठाकरे गटाच्या महिला उप् शहर् संघटक योगिता नाईक यांचे दातीवली येथील फाटक जवळील रस्ता डांबरीकरणासाठी रेल्वे अधिकारी यानां निवेदन……
मा.आमदार,कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे)मा.श्री सुभाषजी भोईर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,उपशहर संघटक महिला आघाडी (शिवसेना-दिवा शहर) सौ.योगिता हेमंत नाईक यांनी आज (DRM)मंडळ रेल प्रबंधक मुंबई मध्य रेल्वे यांच्याशी पत्र व्यवहार करून दातिवली रेल्वे फाटकातील रस्त्यावर् अनेक खड्डे पडले असून अद्याप पर्यंत तेथे डांबरीकरण करण्यात आले नाही फाटक जवळील असंख्य वाहने येजा करित असून आवजड वाहने देखील मोठ्या प्रमाणावर येजा करित आहे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही याचीच दाखल घेत ठाकरे गटाच्या. महिला उप शहर संघटक योगिता नाईक यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी भेट घेत निवेदन देऊन लवकरात लवकर रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे.
यावेळी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते



