Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्हा महिला उत्कर्ष समिती पदाधिका-यांना जनजागृती सेवा समितीच्या वतीने “सन्मानपत्र”देऊन येथोचित सत्कार ……

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4
सिंधुदुर्ग जिल्हा महिला उत्कर्ष समिती पदाधिका-यांना जनजागृती सेवा समितीच्या वतीने “सन्मानपत्र”देऊन येथोचित सत्कार…….
कणकवली-सिंधुदुर्ग जिल्हात पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत महिला उत्कर्ष समिती कार्यरत आहे.८मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तेली आळी,कणकवली येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला उत्कर्ष समितीच्या पदाधिका-यांचा प्रमुख पाहुणे लोकसेवा समिती,मुंबईचे माजी अध्यक्ष,दै.लोकसत्ताचे जेष्ठ पत्रकार यांच्या हस्ते”सन्मानपत्र”प्रदान करुन सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे आत्माराम नाटेकर,सिंधुदुर्ग महिला उत्कर्ष समितीच्या अध्यक्षा ज्योतिका हरयाण यांना संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी गुलाब पुष देऊन स्वागत केले.याप्रसंगी महिला उत्कर्ष समितीच्या ज्योतिका हरयाण,सुप्रिया पाटील,दिपा ताटे,तन्वी सावंत,शोभा पाष्टे,रश्मी रावराणे,स्वरदा खांडेकर,दुर्वा मानकर,नेहा कोळंबकर,दिपा सरुडकर,शुभांगी उबाळे,यांना प्रमुख पाहुणे आत्माराम नाटेकर यांच्या हस्ते “सन्मानपत्र”व गुलाब पुष देऊन गौरविण्यात आले.अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी प्रास्ताविक केले.याप्रसंगी महिला उत्कर्ष समितीच्या अध्यक्षा ज्योतिका हरयाण,महिला समितीच्या पदाधिकारी तन्वी सावंत,सुप्रिया पाटील यांनी आपले मौलिक विचार मांडले.प्रमुख पाहुणे आत्माराम नाटेकर यांनी विविध विषयाला स्पर्श करुन उदाहरणासहीत मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जनजागृतीचे कार्यकर्ते भरत तोरसकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कणकवलीतील जनजागृती सेवा समितीचे कार्यकर्ते विनायक परब,दत्ता कडुलकर,गंधाली तिरपणकर,अस्मिता नाटेकर,प्राची तिरपणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे