सत्तेवर येताच देवेंद्र फडणवीस यांनी आरे येथे मेट्रो ३ ची कार शेड व्हावी या दिशेने तात्काळ पावले उचलली.-बाबूभाई भवानजी …………………………………. उध्दव ठाकरे यांना जबरदस्त दणका
अमित जाधव-संपादक
सत्तेवर येताच देवेंद्र फडणवीस यांनी आरे येथे मेट्रो ३ ची कार शेड व्हावी या दिशेने तात्काळ पावले उचलली.ते अर्थात अपेक्षितच होते. तसे मेसेज अनेकांनी पोचवले होते. एक तर ते न्याय्य आहे आणि दुसरे म्हणजे उध्दव ठाकरे यांना जशास तसे उत्तर आहे. कारण सत्तेवर येताच पहिला निर्णय ठाकरे यांनी आरे कार शेड रद्द केल्याचा घेतला होता.
फडणवीस यांनी आल्या आल्या तो निर्णय फिरवला आणि उध्दव ठाकरे यांना जबरदस्त दणका दिला. आरे कार शेड बद्दल खूप लिहून झाले आहे म्हणून रिपिट करण्याची गरज नाही. तीनच गोष्टी थोडक्यात सांगतोती जमीन जंगल नाही असे मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालात स्पष्ट म्हंटले आहे.नॅशनल ग्रीन ट्रॅब्यूनलने ग्रीन सिग्नल दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही बंदी घातलेली नाही, एकही झाड आता कापावे लागणार नाही असे त्या मेट्रो कंपनीने तिथे शपथेवर सांगीतले आहे आणि पर्यायी जागेचा शोध घेण्याची अजिबात गरज नाही असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.आता उद्घव ठाकरे यांची प्रतिक्रिया वाचा
“माझ्यावरील राग माझ्या मुंबईवर काढू नका.मुंबईच्या काळजात कट्यार घुसली अस करु नका. तुम्हाला हात जोडुन विनंती, माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका. मी मुंबईकरांच्या वतीने आरेचा आग्रह रेटु नका असं आवाहन करतो”असं उद्धव ठाकरे म्हणाले. २५% काम पूर्ण झालेल्या आरे कार शेडला स्थगिती देऊन उध्दव ठाकरे यांनी अहंकाराच्या पुढे मुंबईतील जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. तुम्ही कोण मुंबईकरांच्या वतीने हात जोडून विनंती करणारे? मेट्रो ३ प्रोजेक्ट लांबवल्याबद्दल, राज्याला हजारो कोटी रुपयांच्या खड्ड्यात घातल्याबद्दल, कोर्टाचा वेळ वाया घालवल्याबद्दल तेच हात जोडून आधी मुंबईकरांची माफी मागा. कोण भरणार ते १०००० कोटी रुपये ? खरं तर तुम्ही व्यक्तिशः भरणे हाच योग्य न्याय आहे.तुमच्यावर राग फडणवीस नाही मुंबईकर काढणार आहेत. फडणवीस तर तुमचा अघोरी निर्णय फिरवून मुंबईकरांचे आशीर्वाद मिळवणार आहेत. जेंव्हा मुंबईकर हात जोडून तुम्हाला विनंती करत होते की कार शेड आरे येथेच असावी, प्रकल्पाच्या गळ्याला नख लावू नका तेंव्हा तुमचे हृदय नाही द्रवले.. उलट तेथे नसलेले “जंगल वाचवले” म्हणून तुमचे पर्यावरणप्रेमी पुत्र मुंबईत संतापजनक पोस्टरबाजी करत होते.आज अपेक्षा कोणाकडून करत आहात? काय हक्क आहे तुम्हाला?तुम्ही केलेल्या जखमेवर फडणवीस अत्यंत आवश्यक अशी मलमपट्टी एकही क्षण न दवडता करत आहेत..
फडणवीसांच्या या निर्णयामुळे मुंबईकरांच्या काळजात नव्हे तर तुमच्या उलट्या काळजात कट्यार घुसली आहे.


