Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यावर सुविधांचा प्रकाश हवा ,मनसे आमदार राजू पाटील यांचे रेल्वे महाव्यवस्थापकाना निवेदन,

0 2 0 9 0 9

दिव्यावर_सुविधांचा_प्रकाश_हवा

मध्य रेल्वेवरील एक महत्वाचं स्थानक आणि जंक्शन म्हणजे आपलं दिवा. कसारा, कर्जत पासून ते ठाण्यापर्यंतच्या चाकरमानी नागरिकांसाठी कोकणात जायला दिव्याचा पर्याय सोयीस्कर पडतो. आता गणेशोत्सव जवळ येतो आहे. ह्या पार्श्वभूमीवर दिवा रेल्वे स्थानकातून कोकणासाठी गणपती विशेष गाड्या सोडण्याची मागणी करणारं पत्र आज रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. अनिल कुमार लाहोटी यांची भेट घेऊन दिले. रेल्वे प्रवास करणाऱ्या आपणा दिवेकरांसाठी योग्य त्या सोयी सुविधा मिळाव्यात ह्यासाठी मी नेहमीच आग्रही होतो, आहे आणि राहील. दिवा स्टेशनवर योग्य त्या प्राथमिक वैद्यकीय आणि स्वच्छतेच्या सुविधा नागरिकांना मिळाव्यात, तसेच हमाल, सफाई कर्मचारी आणि पोलीस ह्यांना दिवा स्थानकावर लक्ष केंद्रित करता येऊन दिवा स्थानकाची व्यवस्था सुरळीतपणे पाहता यावी यासाठी आज एका पत्राद्वारे दिवा रेल्वेस्टेशन हद्दीतील समस्यांबाबत सुद्धा रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. शिवाय, महानगरपालिकेतर्फे दिवा पूर्वेकडून पश्चिमेकडे पाणी पुरवठा करण्यासाठीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्याबाबत रेल्वे विभागाने मनपाला तातडीने परवानगी द्यावी अशी मागणीसुद्धा केली. यावेळी मनसे रेल्वे सेनेचे अध्यक्ष श्री. जितू पाटील,
उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघ चे अध्यक्ष श्री. नंदकुमार देशमुख, मनसे जिल्हा संघटक श्री. हर्षद पाटील , दिवा मनसे अध्यक्ष तुषार पाटील आणि मनसेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

निवेदनाद्वारे पुढील मागण्या केल्या –
१) दिवा जंक्शन वरून गणपती विशेष ट्रेन सुरु करणे…
२) दिवा – पनवेल – वसई रोड – पनवेल – रोहा रेल्वे मार्गावरील पॅसेंजरचे बंद केलेले रेल्वे थांबे पुन्हा सुरु करणे..
३) दिवा स्टेशनवरील तिकीट घर, शौचालय व शेड व्यवस्था करणे
४) लोकग्राम ब्रिज सद्यस्थिती बाबत आढावा घेतला.
५) दिवा रेल्वे स्टेशन परिसरात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारणे
६) दिवा स्टेशनसाठी अँब्युलन्स सेवा सुरु करणे
७) दिवा जंक्शन हमाल यांची व्यवस्था करणे.
८) आगासन व दातिवली रेल्वे स्टेशन रस्ता डांबरीकरण करणे.
९) दिवा स्टेशन मास्तर यांची हद्द विभाजन करणे.

मा. महाव्यवस्थापक श्री अनिल कुमार लाहोटीजी ह्या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतील हीच अपेक्षा !

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे