दिव्यात मराठा आरक्षण लढयाची नियोजन बैठक संपन्न…
ठाणे, दिवा ता १४ जाने : सकल मराठा समाज दिवा, जि.ठाणे च्या वतीने २० जानेवारी २०२४ रोजी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई वारी आगमन संदर्भात नियोजन बैठक घेण्यात आली. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, व सावित्री बाई फुले यांना वंदन करून कार्यक्रमास सुरवात झाली , समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी सकल मराठा समाजाचे मुंबई ,ठाणे व नवीमुंबई येथून अनेक बांधव आले होते.
सदर बैठकीत आरक्षणाच्या ऐतिहासिक लढ्यात साक्षीदार होण्यासाठी , अनेक बांधवांनी, भगिनींनी, स्वयंम स्फूर्तीने सामील होण्याची व स्वयंमसेवक बनण्याची शपथ घेतली. ग्रामीण भागातून जे ३ करोड बांधव येणार आहेत त्यांच्यासाठी आपणही काय तरी योगदान दिले पाहिजे हीच सामाजिक भावना जपण्याचा सर्वांनी एकजुटीने ठरविले ,कारण जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपला योद्धा मागे हाटनार नाही आणि मुंबईत आरक्षण लढा जेवढा दिवस चालेल तोपर्यंत आम्ही आमचे कार्ये मराठा समाजाच्या एकजुटीने करण्याचा सर्वानुमते ठरविण्यात आले. दिव्यातील अनेक बांधवांनी या आरक्षणाच्या लढ्यात सामील होण्याचा सहकुटुंब निर्धार केला तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या सर्व समाजबांधवांनी सामील होण्याचे अहवान या ठिकाणी सर्व बांधवांनी करून आपल्या भावना व्यक्त केल्या.



