ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना विविध खेळांमधील आपली गुणवत्ता आणि प्रतिभा दाखवता यावी यासाठी मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या ४ ते १२ फेब्रुवारी दरम्यान खासदार क्रीडासंग्रामाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत ४ फेब्रुवारीला डोंबिवलीतील वै. ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलात दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. यामध्ये १५ हून अधिक खेळांचा समावेश असून कुस्ती, मल्लखांब यांसारख्या पारंपरिक खेळांचाही समावेश असणार आहे. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना ५० लाखांहून अधिक रुपयांच्या रोख रकमेची पारितोषिकेही दिली जाणार आहेत. या संपूर्ण उपक्रमाची माहिती देण्यासाठी आज ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्या माध्यमातून या खासदार क्रीडा संग्रामात मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले. तसेच खासदार क्रीडा संग्राम उपक्रमाचा लोगो आणि ” खेलो जी जान से ” गाण्याचे अनावरण करण्यात आले.
यावेळी शिवसेना राज्य समन्वयक, प्रवक्ते नरेश म्हस्के, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, अरुण आशान, उल्हासनगर महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक राजन केणी, सुभाष साळुंखे, दिवा उपशहर प्रमुख आदेश भगत, युवासेनेचे सागर जेधे, ज्येष्ठ बॅडमिंटन प्रशिक्षक आणि जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड सर यांच्यासह विविध खेळांच्या संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.



