दिव्यात प्रथमच होणाऱ्या उड्डाणपुलास भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे….विकास इंगळे – समाजसेवक
अमित जाधव - संपादक
ठाणे – दिवा शहरातील वाढती लोक संख्या पाहता दिव्यात अनेक विकासकाम होत असताना रस्ते ,उड्डाणपूल अश्या मोठ्या प्रकल्पची कामे प्रगती पथावर आहेत परंतु अद्याप पर्यंत प्रशासनाने त्यांना कोणत्याही थोर महापुरुषांची नाव दिले नाहीत याचीच दखल घेत दिव्यातील दलीत चळवळीतील समाजसेवक विकास इंगळे यांनी दिवा स्टेशन परिसरात व संपूर्ण दिव्यात प्रथमच होणाऱ्या उडानपुलास भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी शिफारस प्रशासनास करत आज काही समर्थकांसह दिवा प्रभाग समितीत येथे निवेदन देण्यात आले.
आपण दिलेल्या निवेदनाचा लवकरच विचार केला जाईल असे प्रभाग समितीतून स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे दिव्यातील बौद्ध समाजात आनंदाचे वातावरण असून येत्या 14 एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील मोठ्या उत्साहात साजरी होणार असताना यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा असे इंगळे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात समस्त बौद्ध धर्मीय समाजाच्या वतीने विनंती पूर्वक कळविले.



