वयोवृद्ध हरी बाई मकरंद यांची अवहेलना कधी संपणार व घर कधी मिळणार?
संजय बोर्डे
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सुमारे ४० हजार झोपड्या २१ वर्षापूर्वी अतिक्रमणाच्या नावाखाली तोडण्यात आल्या आहेत. त्यापैकी साडेतेरा हजार रहिवाशांचे पुनर्वसन संघर्ष नगर चांदिवली पवई या ठिकाणी करण्यात आली आहे. परंतु सोळा ते साडे सोळा हजार रहिवाशी आजही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातीलच ४५ वर्षा पासुन भीमनगर कांदिवली पूर्व मुंबई येथे राहणाऱ्या ९० वर्षीय हरीबाई तुकाराम मकरंद, मालन शिंदे, पुंडलिक भंगारे हे या वनविभागात वरील नमूद ठिकाणी राहतात उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे यांनी पुनर्वसनासाठी सन २०००मध्ये वन विभागात ७०००रुपये भरले आहे.व त्यांच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत हे सतत सदनिकांसाठी वनविभागाकडे चकरा मारत आहेत .वनविभागाकडे पाठपुरावा करत आहेत व २०१६ मध्ये त्यांचे पेपर पात्र होऊन स्कॅनिंग झाले आहे.दिनांक २९ जुलै२०१९रोजी अधिकारी श्री दाभोळकर यांनी सर्व पेपर बघून लॉटरी काढण्याची ऑर्डर काढली होती.व जी नोटीस प्रकाशित केली त्यावर कोणाचाही आक्षेप आलेला नाही. परंतु चार महिन्यांनी पुन्हा दुसऱ्या अधिकाऱ्याने मुद्दाम नोटीस प्रकाशित करून या वयोवृद्ध लोकांची अवहेलना चालवली आहे. दुसऱ्यांदा नोटीस प्रकाशित केल्याने ज्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही ते सुद्धा यामध्ये पत्रव्यवहार करून गरीब व वयोवृद्ध लोकांना नाहक त्रास देत आहेत.
याप्रकारे वयोवृद्ध लॉटरी धारकापैकी भंगारे यांचे निधन झाले आहे व उरलेले दोन्ही त्याच मार्गावर आहेत यापैकी कित्येक लोकांचा घराची आशा करून मृत्यू पावले आहेत व आजही त्यांना घर मिळाले नाही. अशाच प्रकारे सन 2009 मध्ये अनाजी पासबुक या पातर रहिवाशाचे कली पेपर करून वन विभागाच्या अधिकार्यांच्या सहकार्याने करून त्या व्यक्तीने घर हडप केले होते. यांच्या प्रकरण सुद्धा असेच काही घडू शकते असा संशय या रहिवाशांना येत आहे. याबाबत मुख्य वनसंरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वनक्षेत्रपाल तुळशी यांना वारंवार पत्रव्यवहार पाठपुरावा करून सुद्धा या वयोवृद्धांची अवहेलना चालूच आहे.
माझ्याकडे १९८९चा फोटो पास आहे सर्व कागदपत्रे आहेत तरीसुद्धा वन विभाग मला अद्यापही घर देत नाही मग काय मी मेल्यावर देणार का
हरीबाई तुकाराम मकरंद
स्थानय रहिवाशी भिमनगर कांदिवलीमी संबंधित विषयावरती विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत लवकर त्यांचे काम करण्यात येईल
मल्लिकार्जुन
मुख्य वनसंरक्षक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान


