वडाळा च्या एनकेईएस कॉलेज मध्ये Shine 2026 महोत्सव उत्साहात पार पडला…
अमित जाधव - संपादक

एनकेईएस कॉलेज, वडाळा येथील मल्टिमीडिया अँड मास कम्युनिकेशन विभागातर्फे “SHINE 2026″ या बहुप्रतिक्षित शैक्षणिक व सर्जनशील उपक्रमाचे आयोजन १६ फेब्रुवारी २०२६ रोजी एसव्हीआयएमएस सेमिनार हॉल येथे करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि सर्जनशील कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली.
या कार्यक्रमात रिसर्च पेपर सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक आदित्यराज सिंग,शिवश्याम यादव यांना तर द्वितीय क्रमांक नील बॅरेटो,प्रज्ञान बी. ओजस्वी आणि तृतीय क्रमांक मोहिनी भूजबळ या विद्यार्थिनीला प्राप्त झाला. त्याचबरोबर मॉडेल इन मीडिया स्पर्धेत प्रथम क्रमांक यश झगडे, सफवान मुकादम यांना तर द्वितीय क्रमांक रेखा राजभर आणि तृतीय क्रमांक लावण्या मेथारी या विद्यार्थिनीला प्राप्त झाला. तसेच अॅड नोव्हा स्पर्धेत प्रथम क्रमांक साक्षी विठ्ठल गुरव तर द्वितीय क्रमांक राहुल रामचंद्र विटेकर आणि तृतीय क्रमांक ध्रुव पवार या विद्यार्थ्याला प्राप्त झाला. या महोत्सवासाठी रिसर्च पेपर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून भारतीय विद्या भवन हजारीमल सोमानी आर्ट्स, सायन्स महाविद्यालयाच्या समन्वयक श्रद्धा आयरे-शिर्के तर अॅड नोव्हा, मीडिया द मॉडेल स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मीडिया एक्सपर्ट चेतन माथूर यांनी धुरा सांभाळली. या उपक्रमाचे प्रमुख प्रायोजक स्वरूप फाउंडेशन (फाऊंडर स्वराज सस्ते) असून सहप्रायोजक म्हणून रॉक्स डान्स अकादमी (कोरिओग्राफर रवी) यांचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे फोटोग्राफी partner म्हणून ए.के.प्रोडक्शन (आर्यन खेडेकर) तसेच पुरस्कार वितरणासाठी महाराष्ट्र न्यूज (संपादक सागर गवई) यांचे सहकार्य लाभणार आहे.
हा महोत्सव महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नेहा तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली बीएमएमएम विभागप्रमुख श्री. शुभम पेडामकर यांनी यशस्वीरित्या पार पडला.
यावेळी संस्थेचे मान्यवर पदाधिकारी श्री. पार्थसारथी नाईक (अध्यक्ष), श्री. शशिकांत जोशी (सचिव), सौ. पद्यमजा बनवासी (सचिव), मा.भवानी भार्गव (खजिनदार), श्री. अनंत बनवासी (व्यवस्थापन सदस्य), श्री. नारायण नवलेकर (व्यवस्थापन सदस्य) यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे व पाठिंब्यामुळे महोत्सव यशस्वीरित्या पार पडला.



