भारतात पहिले रेल्वे धावलेल्या घटनेला आज जवळपास १६५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. १६ एप्रिल १८५३ मध्ये बोरीबंदर ते ठाणे दरम्यान आशिया खंडातील पहिली रेल्वे धावली होती. ३४ किलोमीटरचं हे अंतर पार करण्यासाठी रेल्वेला एका तासचा अवधी लागला होता. १४ डब्यांच्या या रेल्वेतून जवळपास ४०० प्रवाशांनी प्रवास केला होता. आज प्रवाशांची संख्या लाखोंच्या घरात गेली आहे. देशभरात दररोज लाखो रेल्वेने प्रवास करतात. देशभरात रेल्वेचं जाळं पसरलं आहे. जगात सर्वात जास्त रेल्वेचं जाळं असलेल्या देशांत भारताचा समावेश होतो. देशात प्रत्येक नागरिकाने एकदातरी रेल्वेने प्रवास केलेलाच असले. आजही लांबच्या प्रवासासाठी रेल्वेला पहिला पसंती दिली जाते. रेल्वे प्रवासादरम्यान अनेक रेल्वे स्टेशन लागतात. प्रत्येक रेल्वे स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्मवर त्या त्या रेल्वे स्टेशनचं नाव
लिहिलं असतं. प्लॅटफोर्टवर एका मोठ्या पिवळ्या रंगाच्या बोर्डवर काळ्या रंगाच्या अक्षरात त्या स्टेशनचं नाव कोरलेलं असतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, भारतात पिवळ्या रंगाच्याच बोर्डवर स्टेशनची नावं का
असतात यामागचं कारणही अतिशय मनोरंजक आहे. पिळवा रंग हा अगदी दूरवरुनही चमकतो. प्लॅटफॉर्मवरील पिवळ्या रंगाचा बोर्ड लोका पायलटला दूरवरुनच दिसतो आणि त्यानुसार तो ट्रेनचा स्पीड कमी करतो. ट्रेन कधी लिहिली जातात.
आणि कुठे थांबवयाची आहे याचा अंदाज बोर्डमुळे लोको पायलटला येतो. दिवसात पिवळा रंग उन्हात दूरवरुनही चमकतो, तर तर रात्रीही पिवळा रंग स्पष्टपणे दिसतो. त्यामुळेच रेल्वे स्टेशनवर पिवळ्या रंगाच्या बोर्डचा वापर केला जातो. पिवळ्या रंगाच्या बोर्डवर काळ्या रंगाची अक्षरं ठळकपणे उठून दिसतात. याशिवाय उन आणि पावसाचाही पिवळ्या रंगावर फारसा परिणाम होत नाही. लाल रंगानंतर पिवळ्या रंगाची वेवलेंथ ही सर्वाधिक असते. याच कारणाने शाळेच्या बसेसही पिवळ्या रंगात रंगवल्या जातात. पिवळ्या रंगाची पार्श्व परिधीय दृष्टी लाल रंगापेक्षा १.२४ पट जास्त असते. म्हणजे इतर कोणत्याही रंगाच्या तुलनेत हा रंग दुरून अगदी सहज दिसू शकतो. त्यामुळेच भारतात सर्व रेल्व स्टेशनची नावं पिवळ्या बोर्डवर लिहिली जातात.



