ब्रेकिंग
आताची सर्वात मोठी बातमी, मुंबईतील कोंचींग क्लासेस ची बस जुना मुंबई पुणे हायवे ने घाट उतरताना पलटी,दोन विद्यार्थी मृत्यू मुखी..
अमित जाधव - संपादक
लक्झरी बस क्रमांक MH 04) GP 2204 ही बस लोणावळा येथून चेंबूरच्या दिशेने जात होती. सदर बस मध्ये मयांक कोचिंग क्लासेस, चेंबूर येथील दहावीच्या वर्गातील एकूण 48 विद्यार्थी प्रवास करत होते.
त्यांच्यासोबत कोचिंग क्लासचे दोन शिक्षक देखील आहेत. सदर बस ही जुन्या मुंबई पुणे हायवेने येत असताना घाट उतरताना रात्री सुमारे 8.00 वाजता दरम्यान मॅजिक पॉईंट जवळ डाव्या बाजूला पलटी झाल्यामुळे अपघात होऊन सदर अपघातामध्ये जवळपास सर्व विद्यार्थी जखमी झालेले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना लोणावळा, खोपोली व आजूबाजूच्या परिसरातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
एक मुलगा व एक मुलगीचा द्र्दैवी मृत्यु झाला आहे.
बस हायड्राच्या साह्याने बाजूला घेण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे.