ब्रेकिंग
अखेर दिव्यात सार्वजनिक सुलभ शौचालयाचे उद्घाटन, माजी.उप महापौर रमाकांत मढवी यांच्या हस्त उद्घाटन…..
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता 27 मे : दिवा शहरातील दिवा-आगासन रोडवरील दिवा चौकात अनेक वर्षांपासून दिवेकरांची मागणी असलेलं सार्वजनिक सुलभ शौचालय आज लहुजी साळवे सामाजिक मागासवर्गीय संस्था यांच्या सौजन्याने व मा नगरसेवक शैलेश पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे तयार करण्यात आले. मा.उप महापौर रमाकांत मढवी यांच्याहस्ते सुलभ शौचालयचे उद्घाटन करण्यात आले.
प्रसंगी दिवा शिवसेनेचे मा नगरसेवक शैलेश पाटिल, अमर पाटिल, मा नगरसेविका दिपाली उमेश भगत, तसेच आदेश भगत ( दिवा उपशहरप्रमुख )
उमेश भगत ( विभागप्रमुख )
,भालचंद्र भगत ( विभागप्रमुख ), निलेश पाटिल ( विभागप्रमुख ), गुरुनाथ पाटिल ( विभागप्रमुख ) व सर्व दिवा शिवसेना शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.