बाळासाहेबांची शिवसेना आयोजित,धर्मवीर मित्र मंडळ च्या सहयोगाने यंदाचा दिवेकरांचा “दिवा महोत्सव ” मोठ्या थाटामाटात सुरू….
अमित जाधव - संपादक
दिवा (प्रतिनिधी) कोरोना काळानंतर दिव्यातील जनतेच्या मनात चैतन्य निर्माण करण्यासाठी आज चौदाव्या दिवा महोत्सवाला सुरवात होत असून युवा किर्तनकार ह.भ.प.वैष्णवी महाराज यांच्या हस्ते फित कापून उत्सवाला प्रारंभ करण्यात आला.यावेळी दिवा महोत्सव मैदानात दिव्यातील जनतेने मोठ्या संख्येने गर्दी केली होती.बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत आणि धर्मवीर मित्रमंडळ आयोजित दिवा महोत्सव आज 25 डिसेंबर पासून ते 30 डिसेंबर पर्यंत साजरा होणार आहे.
धर्मवीर मित्रमंडळ आयोजित दिवा महोत्सवाला आज 16 वर्षे पुर्ण होत आहेत.कोरोना काळानंतर दोन वर्षांनी हा महोत्सव तुफान गर्दीने साजरा होत आहे.दिवेकर या महोत्सवाची दरवर्षी आतुरतेने वाट पहात असतात.त्यामुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर हा महोत्सवला प्रारंभ होत आहे.युवा किर्तनकार ह.भ.प.वैष्णवी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर ठाणे शहराचे माजी उपमहापौर श्री रमाकांत मढवी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.तसेच बाळासाहेब ठाकरे,धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पन करुन अभिवादन केले.
यावेळी कार्यसम्राट माजी नगरसेवक श्री शैलेश पाटील, मा.नगरसेवक श्री अमर पाटील,मा.नगरसेवक श्री दिपक जाधव,मा.नगरसेविका सौ.दिपाली भगत,माजी नगरसेविका सौ.दर्शना म्हात्रे, श्री भालचंद्र भगत,बाळासाहेबांची शिवसेना संघटन श्री आदेश भगत,शाखाप्रमुख श्री निलेश म्हात्रे,समाजसेविका सौ.अर्चना पाटील आणि निलेश पाटील आदींसह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.