ब्रेकिंग
ठाण्यातील मुंब्रा येथे नशा करू नको, असे सांगितल्याने मित्रानेच मित्राची केली हत्या..
अमित जाधव - संपादक
नशा करू नको, असे सांगितल्याने हत्या
ठाण्यातील मुंब्रा येथे नशा करू नको, असे सांगितल्याने मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. मेहताब मंसुरी असे मृत अल्पवयीन मुलाचे नाव आहे. तर फैज सुलतान मलिक असे आरोपीचे नाव आहे. मेहताब गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता होता. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी मुंब्रा पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी मेहताबचा शोध घेतला असता 9 जून रोजी त्याचा मृतदेह सापडला. तपासात सुलतानने हत्या केल्याचे स्पष्ट झाले