ब्रेकिंग
खासगी कोचिंग क्लासेस ला आता बसणार चाप,केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी…
अमित जाधव - संपादक
विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटना, आगीच्या घटना, कोचिंगच्या घटनांमध्ये सुविधांचा अभाव तसेच त्यांनी अवलंबलेल्या अध्यापनाच्या पद्धतींबाबत सरकारकडं आलेल्या तक्रारींनंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे
काय आहेत नव्या मार्गदर्शक सूचना?
- कोणतेही कोचिंग सेंटर पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांना नियुक्त करू शकत नाहीत.
- कोचिंग सेंटर्समध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी संस्था दिशाभूल करणारी आश्वासने देऊ शकत नाहीत
- पालकांना दर्जा किंवा चांगल्या गुणांची हमी देऊ शकत नाहीत.
- संस्था 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकत नाही.
- विद्यार्थ्यांची नोंदणी ही माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच व्हायला हवी.
- दिशाभूल करणारी जाहीर कोणतीही कोचिंग संस्था करु शकत नाही.
- कोचिंग सेंटर्स नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या कोणत्याही शिक्षक किंवा व्यक्तीची सेवा घेऊ शकत नाहीत.
- या मार्गदर्शक तत्त्वांच्या समुपदेशन प्रणाली असल्याशिवाय संस्थेची नोंदणी केली जाणार नाही.
- कोचिंग सेंटर्सकडे ट्यूटरची पात्रता, अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा कालावधी, वसतिगृहाची सुविधा आणि आकारले जाणारे शुल्क यांचा अद्ययावत तपशील असलेली वेबसाइट असावी.