दिव्यात रस्त्यावरील गतीरोधक अभावी आपघातांची मालिका सुरूच ,ज्येष्ठ महिलेचा अपघात,कलव्याच्या रुग्णालयात दाखल…
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता २९ फेब्रुवारी : दिवा शहरातील दिवा-आगासन या मुख्य रस्त्यावरील गतीरोधक अभावी आपघातांची मालिका सुरूच राहिली आहे. दोन दिवसापूर्वी गतिरोधक अभावी ऐका ३५ वर्षीय महिलेस भरधाव दुचाकीने उडवील्याने पाय मोडल्याची घटना ताजी असताना काल याच रस्त्यावर गतिरोधक अभावी भरधाव रिक्षाने बेडेकर नगर येथे ३० वर्षीय महिलेस उडविले असता सदर महिलेस बेडेकर नगर येथील ऐका खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते प्रसंगी दिवा शहर वंचितचे अध्यक्ष मिलिंद गवई व भाजपचे प्रकाश पाटील यांनी हॉस्पीटल मध्ये धाव घेतली परंतू परिस्थिती गंभीर असल्याने तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले तर आज याच रस्त्यावर म्हसोबादेव नगर येथे शाळकरी विद्यार्थ्याला दुचाकीने धडक दिल्याने किरकोळ दुखापत झाली.
दिवा शहरातील दिवा-आगासन या मुख्य रस्त्यावरील जुने (जीर्ण ) झालेले गतिरोधक काढण्यात आले आहेत. परिणामी गतिरोधक अभावी वाहनांचा वेग वाढल्याने अनेक आपघात होऊ लागले आहेत. दररोज शेकडो वाहनांची ये-जा असते. भविष्यात गतिरोधकाच्या अभावामुळे मोठी दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन की लोकप्रतिनिधी पहात आहे ? असा प्रश्न दिवेकर नागरिकांत निर्माण झाला आहे. नुकतेच दिवा भाजप महिला मोर्चा अध्यक्षा सपना रोशन भगत यांनी तातडीने कायम स्वरूपी व पक्के गतिरोधक बसविण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती.