
महायुतीच्या जागावाटपाबाबत बैठका सुरू आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाणे जिल्ह्यातील 18 जागांपैकी 10 जागांची मागणी केल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे गट 10, भाजप 6 आणि अजित पवार गटाला 2 अशा जागा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ठाणे जिल्ह्यात भाजपचे सध्या 8 आमदार आहेत. त्यामुळे भाजप विद्यमान आमदारांची जागा सोडण्यास तयार नाही. यावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.