दिवा बेतवडे येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत आरोग्य शिबिर व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन…
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा शहरातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व ठाणे महानगर पालिकेचे धर्मवीर आनंद दिघे हृदयरोग उपचार केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिवा शहरातील बेतवडे, येथे मा.मुख्यमंत्री, पक्षप्रमुख श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत भव्य आरोग्य शिबिर व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन, दि. २७/०७/२०२३ रोजी कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख मा. आमदार श्री सुभाषजी भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक शाखाप्रमुख श्री अजित माने व संजय निकम यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी दिवा शहरातील शेकडो नागरिकांनी व गरजु रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.
शिबिराला जिल्हाप्रमुख श्री सदानंद थरवळ, सह संपर्क प्रमुख श्री अरविंद बिरमोळे , उपशहरप्रमुख श्री सचिन पाटील, युवासेना शहर अधिकारी श्री अभिषेक ठाकुर , उपशहर संघटीका सौ योगिता नाईक, विभागप्रमुख श्री गुरूनाथ नाईक , विभागप्रमुख श्री चेतन पाटील, विभागप्रमुख श्री मच्छिंद्र लाड, विभाग संघटीका सौ स्मीता जाधव व सर्व शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख सर्व शिवसैनिक व पदाधिकारी यांची उपस्थीती व मोलाचे सहकार्य लाभले असे शाखाप्रमुख अजित माने यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.