ब्रेकिंग
शिवसेना खोपट शाखेच्या वतीने जरायु आयुर्वेद पंचकर्म व योग क्लिनिक च्या सहकाऱ्याने मोफत आरोग्य शिबीर संपन्न,शेकडो नागरिकांनी घेतला लाभ….
अमित जाधव - संपादक
जरायु आयुर्वेद पंचकर्म व योग क्लिनक व शिवसेना शाखा खोपट,ठाणे यांच्या सहकार्यने
दिनांक २२/४/२३ रोजी शिवसेना शाखा खोपट येथे मोफत आरोग्यतपासणी शिबीर घेण्यात आली.
१५० पेक्षा जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित होते.या शिबिरात रुग्णांचे नाडीपरिक्षण, अग्निकर्म,विद्धकर्म तसेच आहार आणि योग मार्गदर्शन व मोफत रक्तपरिक्षण व औषधी वाटप करण्यात आले.या शिबिरास डॉक्टर म्हणून जरायु आयुर्वेद क्लिनिक चे डॉ. तेजस मोरे, डॉ. अनुजा सालवटकर-मोरे आणि डॉ अनुश्री कडूकर तसेच शिवसेना खोपट शाखा,ठाणे यातील विनोद शिर्के,मधुकर मोरे,किरण शिंदे,सत्यवान गावकर तसेच सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.