बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिव्यात वाढते अपघात पाहता दिवा अगासणं या मुख्य रस्त्यांवर तातडीने गतिरोधक बसवावे…

अमित जाधव - संपादक

ठाणे, दिवा ता २७ फेब्रुवारी : ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीतील दिवा शहरातील दिवा-आगासन या मुख्य रस्त्यावरील जुने (जीर्ण ) झालेले गतिरोधक काढण्यात आले आहेत. परिणामी गतिरोधक अभावी वाहनांचा वेग वाढल्याने अनेक आपघात होऊ लागले आहेत. सदर दिवा- आगासन रस्त्यावर दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. काल दि. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी सदर रस्त्यावर एकूण चार आपघात झाले असून अनेकांना इजा झाली आहे तर ऐका ३५ वर्षीय महिलेचा भरधाव दुचाकीने उडवील्याने पाय मोडला असून सदर महिलेस खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहे. भविष्यात गतिरोधकाच्या अभावामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये यासाठी तातडीने कायम स्वरूपी व पक्के गतिरोधक बसविणे गरजेचे असून त्यामुळे आपघात कमी होतील. अनेक अवजड वाहनांमुळे शाळेकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ता ओलांडने खूप जिकरीचे होऊ लागले आहे.

प्रकरणी दिवा भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा सपना रोशन भगत आक्रमक झाल्या असून त्यांनी ठाणे महानगर पालिकेच्या दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त अक्षय गुडधे यांना निवेदन देऊन सदर रस्त्यावर तातडीने कायम स्वरूपी व पक्के गतिरोधक बसवावे ही विनंती केली आहे अन्यथा भारतीय जनता पार्टी आक्रमक होऊन आंदोलन करेल असे स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे