कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने महाराष्ट्रात शिरकाव, सर्व जिल्हयांना दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन…
अमित जाधव - संपादक
केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्याची माहिती समोर आली होती. या व्हेरिएंटमुळे केरळमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने महाराष्ट्रात शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे
गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि कोविड नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. या नवीन व्हेरीयंटच्या पाश्र्वभूमीवर सर्व जिल्हयांना दक्षता घेण्याचे कळविण्यात आलं आहे. रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
8 डिसेंबर रोजी भारतात JN.1 व्हेरिएंटचा पहिलं प्रकरण समोर आलं होतं. केरळमधील 79 वर्षीय महिलेला याची लागण झाली होती. ही बाब समोर आल्यानंतर केरळसह शेजारील राज्यांना सतर्क करण्यात आले. त्याचवेळी, सोमवारी केंद्र सरकारने राज्यांना कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता. केंद्राने राज्यांना आरटी-पीसीआरसह पुरेशा चाचण्या सुनिश्चित करण्याचा सल्ला दिला आहे आणि जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सकारात्मक नमुने INSACOG प्रयोगशाळांमध्ये पाठवावेत