दिव्यात मराठी पाठ्यांच्या मुद्यावरून १२० दुकानदारांना ठाणे मनपाची नोटीस…
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता १२ डिसें : मराठी पाठ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ मधील कलम ३६ क नुसार दुकाने व आस्थापना यांचे नामफलक मराठीत असणे बंधनकारक आहे. पालिका हद्दीतील नऊ प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांवर नामफलक मराठीत आहेत का ? याबाबत जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्यामार्फत दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी असतील याची तपासणी करण्यात येत आहे.
ठाणे पालिकेने सुध्दा गेल्या काही दिवसांपासून दुकानदारांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत ठाणे महानगर पालिका हद्दीतील ४७६ दुकानदारांना नोटीस बजावली आहे तर दिवा शहरात एकूण १२० दुकानदारांना नोटीस बजावली आहे. आतापर्यंत दिलेल्या नोटीस कोपरी -नौपाडा २८, माजिवडा -मानपाडा ३४, लोकमान्य नगर – सावरकर नगर ७६, उथळसर १४५, वर्तकनगर ०५, मुंब्रा ४१, दिवा १२०, वागळे १३, कळवा १४. नोटिसा बजावण्यात आल्या आहेत