ब्रेकिंग
भाजप चे कपिल पाटील यांच्या वर गुन्हा दाखल,मतदानाच्या दिवशी कपिल पाटलांनी मतदान केंद्रावरील पोलीस अधिकाऱ्याला केली शिवीगाळ…
भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी कपिल पाटलांनी मतदान केंद्रावरील पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता शांतीनगर पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रोहित पवारांनी शिवीगाळीचा व्हिडीओ ट्वीट करत टीका केली होती.