दिव्यात नालेसफाई च्या नावाखाली हातसफाई, ठेकेदारावर कारवाईची भाजपची मागणी
दिवा:-दिव्यातील नालेसफाईच्या कामात मध्ये हातसफाई झाली असून गैरव्यवहार करणाऱ्या संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिवा भाजपचे शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केली आहे.
शहरातील नालेसफाई न झाल्याने अनेक सकळ भागांत व चाळींमध्ये पाणी घुसण्याची शक्यता असल्याचे सांगत रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी माजी नगरसेवक नालेसफाई बाबतच्या गैरव्यवहार वर गप्प का?असा सवाल भाजपचे दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी नालेसफाई पाहणी दौऱ्यानंतर केला आहे.दिव्यात दर वर्षी पाणी तुंबते ते केवळ मलिदा लटणाऱ्या ठेकेदार व त्यांच्या सत्ताधारी नेत्यामुळे असा आरोप मुंडे यांनी केला आहे.
यावर्षी ही दिवा शहरातील नालेसफाई नियमानुसार झाली नसल्याचा आरोप भाजपने केला आहे.दिवा भाजपच्या माध्यमातून नुकताच मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे,महिला अध्यक्षा ज्योती युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर ओबीसी अध्यक्ष रोशन भगत,विजय भोईर यांनी कार्यकर्त्यांसह नालेसफाई च्या कामाचा पाहणी दौरा केला.या दौऱ्यात अनेक नाले हे अद्याप साफ करण्यात आले नसल्याचे निरीक्षण भाजपच्या वतीने नोंदवण्यात आले आहे.दिव्यातील नालेसफाई मधील हातसफाई पालिका आयुक्तांच्या लक्षात आणून देणार असल्याचे रोहिदास मुंडे यांनी सांगितले आहे.