डॉ च्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू डॉक्टरांना अटक करण्याची प्रकाश सुर्वे व रहिवाशांची मागणी…..
अमित जाधव-संपादक
डॉ च्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
डॉक्टरांना अटक करण्याची प्रकाश सुर्वे व रहिवाशांची मागणी
प्रभाग क्र २६ मधील सकीरा निसार शेख वय ४० वर्ष राहणार दामू नगर, कांदिवली ( पु ) मुंबई यांचा उपचारा दरम्यान गँलेक्सी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल
दत्तपाडा,राजेंद्र नगर, बोरीवली ( पु ) डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आणि हॉस्पिटल व्यवस्थापन या गोष्टीसाठी नकार देत होते. या वेळी नातेवाईक व स्थानीय रहिवाशी आक्रमक झाले तेव्हा रुग्णालय प्रशासनाने मयत महिलेचे दवाखान्याचे ८५हजार रुपये बिल माफ करण्याचे सांगितले.परंतु जो पर्यंत डॉ.अमोल महाजन व डॉ राजेश राव यांनाअटक करण्यात यावी व मृत व्यक्तीस आणि त्यांच्या घरच्यांना न्याय मिळावा म्हणून पोलीस प्रशसानाकडुन दोषी डॉक्टरांना त्वरित अटक करण्यात यावी म्हणून आमदार प्रकाश सुर्वे यांनी पोलिस-उपायुक्त सोमनाथ घार्गे यांना सांगिते. यावेळी उपविभागप्रमुख चेतन कदम, शाखाप्रमुख श्
विठ्ठल नलावडे, रईस शेख, विवेक पंडागळे,अशोक परब, सचिन केळकर, मनोहर देसाई यांच्यासह शेकडो रहिवाशी उपस्थित होते .
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही सर्व पेपर ताब्यात घेवून संबंधित डॉ व रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करू
सोमनाथ घार्गे
पोलीस उपायुक्त परी १२डॉ.च्या हलगर्जीपणामुळे यापूर्वी बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला आहे.व बऱ्याच बोगस डॉ चे पेव फुटले आहे. नसिरा शेख यांचा मृत्यू डॉच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे त्यावर सबंधित कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे व त्या हॉस्पिटल चा परवाना रद्द झाला पाहिजे, जेणे करून भविष्यात अश्या संकटाना कोणी कारणीभूत ठरू नये.
पत्रकार संजय बोर्डे
संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन