दिव्यातील समाजसेवक अशोक सोलंकी यांचा समाजाला आगला वेगळा संदेश… पत्नीचा वाढदिवस साजरा केला गो शाळेत….
अमित जाधव - संपादक
दिवा शहराचे समाजसेवक अशोक सोलंकी यांनी आपल्या धर्मपत्नी यांचा जन्म दिवस भिवंडी स्थित गो शाळेत आयोजित करून एक आगळा वेगळा संदेश समाजाला दिला आहे.अशोक सोलंकी हे नेहमीच समाजकार्यासाठी अग्रेसर असतात.
गायीसाठी चारा टाकणे, पाणी पाजणे, पाण्याच्या टाक्या स्वछ करणे साफसफाई करणे अशी गो सेवक दिवस भर सेवा देतात. दुष्काळाची परिस्थिती असल्याने रोज गायी घेऊन शेतकरी येतात परंतु एवढ्या गायी सांभाळणे शक्य होऊ शकत नाही. याचे दुःख वाटते , श्रमदान करणाऱ्या गो-सेवकांचा ओघ हळूहळू वाढत आहे. त्यामुळे कार्य उरण्याचा हुरुप वाढत आहे समाजासाठी एक वेगळा आदर्श करावा व भारतमाता नंतर खरी माता असेल तर गोमाता असे ही सोंलकी यांनी सांगत असताना हीच गोमाता शेतकरी कतल करणान्यास विकतो तेव्हां अत्यन्त दुःख होते, म्हणून जास्तीत जास्त गोशाळा निर्माण झाल्या पाहीजेत असे आवाहन त्यांनी गोप्रेमीना केले आहे .
सोलंकी कुटुंब संपूर्ण परिवारासह येथे दिवसभर सेवा देऊन आपला वाढदिवस त्यांनी साजरा केला आहे.