१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी गोर-गरिबांना तिरंगा झेंडा देवून,देशाचा गौरव…! “राष्ट्रीय पत्रकार महासभा” महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांची संकल्पना…!
अमित जाधव - संपादक
“राष्ट्रीय पत्रकार महासभा” महाराष्ट्र राज्य, वरिष्ठ पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने १५ ऑगस्ट ,स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गोर-गरीब ज्येष्ठ नागरिकांना व बालकांना तिरंगा झेंडा,बिस्कीट,पाणी,चॉकलेट देवून,तिरंगा झेंड्याचा सन्मान व देशाचा गौरव करण्यात आला.
“राष्ट्रीय पत्रकार महासभा” महाराष्ट्र राज्य,ठाणे जिल्ह्याच्या कल्याण – डोंबिवली शहरात ही संकल्पना राबविण्यात आली. “राष्ट्रीय पत्रकार महासभा” सामाजिक संघटना ही मध्यप्रदेश,उत्तर प्रदेश,भोपाल,लखनऊ या राज्यात अग्रगण्य पत्रकार संघटना म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्यात ही संघटना कार्यरत झाली असून,विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष-कपिल धाकड यांच्या निर्देशानुसार तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष – सुभाष द.पटनाईक यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष – सुरेश मणी शेट्टी,प्रदेश महिला.अध्यक्षा – डॉ.वैष्णवी अय्यर, उपाध्यक्ष-अतुल जाधव,प्रदेश महासचिव-डॉ.सुरेश ओगले,प्रदेश सचिव-संजय भोराडे यांच्या नेतृत्वाखाली,राष्ट्रीय पत्रकार महासभा चे सदस्य यांच्या परिश्रमाने ,कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक,पत्रिपुल ते डोंबिवली’गार्डा सर्कल येथील दिवंगत कॅप्टन विनय कुमार सच्चान स्मारका पर्यंत गोर-गरीब ज्येष्ठ नागरिक, लहान बालक यांना तिरंगा झेंडा,बिस्कीट,पाणी,चॉकलेट देवून,तिरंगा झेंड्याचा सन्मान,तसेच देशाचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या नंतर “राष्ट्रीय पत्रकार महासभा” चे वरिष्ठ पदाधिकारी यांनी डोंबिवली येथील हॉटेल क्लासिक मध्ये पदाधिकाऱ्यांना विशेष बैठक घेवून,चर्चा केली, शाकाहारी भोजनाचां स्वाद घेवून,कार्यक्रमाचा समारोप केला.*