बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

आता महाराष्ट्र शासन मोफत देणार ऑनलाईन शिधापत्रिका – सु. अ. जड्यार,.नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन सेवेद्वारे ई – शिधापत्रिका निशुल्क (मोफत) उपलब्ध करुन देण्याचा निर्णय..

अमित जाधव - संपादक

महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक शिवाप/२०२१/प्र.क्र.१९/नापु२८/मंत्रालय दि. १६ मे २०२३ नुसार सर्व शिधापत्रिकाधारकांना तसेच नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन सेवेद्वारे ई – शिधापत्रिका निशुल्क (मोफत) उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासन MAHAFOOD पोर्टलवर ई- शिधापत्रिका करिता https:/rcms.mahafood.gov.in या वेबसाईटवर अर्ज करावा. अर्जदारांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाईन ई शिधापत्रिका उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्जदारास संबंधित संकेतस्थळावरून सदर ई शिधापत्रिका डाऊनलोड करता येईल. सर्व शिधापत्रिकाधारक व अर्जदार यांनी सदर सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिधावाटप कार्यालय क्रमांक ४१ फ ठाणेचे शिधावाटप अधिकारी सु.अ. जड्यार यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन शिधापत्रिका मोफत देण्याच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना शिधावाटप कार्यालयात निष्कारण फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, मनस्ताप होणार नाही व आर्थिक फटकाही बसणार नाही तसेच ऑनलाईन प्रक्रियेमुळे शिधापत्रिकेचे काम हे अधिक सुस्पष्टतेने, अधिक पारदर्शकतेने व अधिक जलदतेने होऊन सर्वसामान्य नागरिकांना तत्काळ शिधापत्रिका मिळणे सोपे जाईल, असे मतही शिधावाटप अधिकारी सु.अ जड्यार यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे