दिव्यातील 14 विद्यार्थ्यांनी कराटे स्पर्धेत मिळवली 24 पदके….
अमित जाधव-संपादक
दिव्यातील 14 विद्यार्थ्यांनी कराटे स्पर्धेत मिळवली 24 पदके.
ठाणे, दिवा ता 1 मे : जम्मू आणि काश्मीर स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ जम्मू आणि काश्मीर येथे आयोजित 5 वी स्पोर्ट्स कॅम्पो नॅशनल चॅम्पियनशिप 2022 स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
श्रीराम शोतोकन कराटे-डू आणि कुबुडो असोसिएशन ठाणे (दिवा) एकूण 14 विद्यार्थ्यां सहभागी झाले होते. सदर स्पर्धेत 14 विद्यार्थ्यांनी एकूण 24 पदके जिकंली त्यात 12 सुवर्ण पदक, 6 रौप्य पदक तर 6 कांस्य पदक मिळवण्यात यश मिळाले. प्रसंगी डॉ.एस.एम.बाली सहसचिव (भारतीय ऑलिम्पिक संघटना) स्पोर्ट्स कॅम्पो असोसिएशन ऑफ इंडिया अध्यक्ष डॉ. रवी लालवानी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या कठोर सराव आणि आत्मविश्वासाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदर स्पर्धेत दिव्यातील कराटे प्रशिक्षक व मार्गदर्शक श्री ऋषिकेश श्रीराम भगत यांचं मोलाचं सहकार्य लाभले. सदर स्पर्धेत पश्चिम बंगाल, पंजाब , हरियाणा , महाराष्ट्र, कर्नाटक , तामिळनाडू , झारखंड , उत्तर प्रदेश व इतर राज्यातून एकूण 350 विद्यार्थी उपस्थित होते.