दिवा येथील राहत्या घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलाला सतत आठ दिवस शोधमोहीम राबवून हैद्राबाद येथून ताब्यात घेण्यात मुब्रा पोलिसांना यश…..
अमित जाधव-संपादक
दिवा येथील राहत्या घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलाला सतत आठ दिवस शोधमोहीम राबवून हैद्राबाद येथून ताब्यात घेण्यात मुब्रा पोलिसांना यश…..
ठाणे-दिव्यातील मुंब्रा देवी कॉलनीतील शिवलीला अपारमेन्ट येथून अल्पवयीन मुलगा मृणाल अवटे वय(१७) हा २१ नोव्हेम्बर रोजी कोणास काहीही न सांगता घरातून निघून गेला मुलगा घरी आला नाही या भीतीने पालकांनी जवळच्या मुंब्रा पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत तक्रार नोंदवली.
मुलगा अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी दाखल घेत शोधकार्यास गती दिली.घर सोडते वेळी मुलाने ऑनलाइन शिक्षणासाठी वापरत असलेला मोबाईल फोन देखील घरीच सोडला व कोणास काहीही न सांगता निघून गेल्याअसल्याकारणाने पोलिसांना देखील मुलगा नक्की कुठे गेला असेल याबाबत सविस्तर महिती मिळत नव्हती.मा.श्री.अविनाश अंबुरे (पोलिस आयुक्त परिमंडळ-1ठाणे शहर) यांनी सदर गुन्हा उघडीस आणण्याकरिता पोलीस पथके तयार करून शोधमोहीम राबवण्या बाबत सूचना दिल्या होत्या तपास पथकाने दिवा ते कल्याण रेल्वेस्टेशन वरील सी.सी.टी.व्ही फुटेज तपासणी करून गुन्ह्यातील अल्पवयीन मुलगा हा २१ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबई हैद्राबाद एक्सप्रेस मध्ये बसल्याचे निष्पन्न झाले मा.श्री.व्यंकट आंधळे(सहायक पोलीस आयुक्त कलवा विभाग),श्री.दादाहरी चौरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुब्रा पोलीस स्टेशन),गीताराम शेवाळे(पोलीस निरीक्षक, गुन्हे)यांनी सहायक पोलिस निरीक्षक मा.श्री.शहाजी शेळके यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदाराच्या टीम तयार करून त्यांना सूचना कल्याण ते हैद्राबाद मार्गाच्या रेल्वेस्थानकावरील सी.सी.टी.वि फुटेज तपासणी व मुलाचा शोध घेण्यास रवाना केले.तपास पथकांनी कल्याण ते हैद्राबाद रेल्वेस्थानकावरील सी.सी.टी.वि फुटेज व आजूबाजूच्या परिसरातील तपासणी करून अहोरात्र परिश्रम घेऊन शोध मोहीम राबवली.अल्पवयीन मुलास लोणावळा स्थानकापुढील भाग अपरिचित असल्याने लोणावळा ते हैद्राबाद दरम्यान प्रमुख रेल्वेस्टेशन वरील शहरी भागात तो उपजीविकेकरिता कोणत्या तरी आस्थापनामध्ये काम करण्याची शक्यता गृहीत धरून त्याप्रमाने पथकाने शोधमोहीम राबवली असता हॉटेल डी.एम.रेसिडेन्सी मध्ये अल्पवयीन मुलगा आठ दिवसापासून काम करीत होता तत्पूर्वी २९ नोव्हेम्बर २०२१ रोजी तो अन्यत्र ठिकाणी निघून गेल्याचे पोलिसांना समजले त्या मुळे तो आजूबाजूच्या परिसरात कोठेतरी कामकारण्याच्या अनुषंगाने शोध घेतला असता दि.30 रोजी सकाळी सहा च्या सुमारास नांमपल्ली हैद्राबाद राज्य तेलंगणा येथून H.P पेट्रोल पंपावर काम करीत असताना मुलास सुखरूप ताब्यात घेतले पोलिसांना पुढील तपासात मुलाने सांगितले की कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षण पद्धतीत त्याला आगामी बारावीच्या परीक्षेत अपेक्षित गुन मिळतील की नाही ही भीती होती म्हणून कोणास काही न सांगता तो घरातून निघून गेला होता सादर मुलाचे समुपदेशन करण्यात आले असून पालकाच्या ताब्यात देण्यात आले आहे सतत आठ दिवस अथक परिश्रम घेऊन कोणताही धागादोरा नसताना मुलास शोधून काढले यामुळे दिव्यातील पोलिसांचे कौतुक होत आहे.
सदर कारवाई मा.श्री.जयजीत सिग(ठाणे पोलीस आयुक्त,ठाणे शहर)मा.श्री.सुरेश मेकला(पोलीस सह आयुक्त),श्री.अनिल कुंभारे(अप्पर पोलिस आयुक्त),मा.श्री.अविनाश अंबुरे (पोलीस उपायुक्त परिमंडळ-1ठाणे),मा.श्री.व्यंकट आंधळे (सहायक पोलिस आयुक्त ,कळवा विभाग),मा.श्री.दादाहरी चौरे(वरिष्ठ पोलीस निरीक्षक-मुंब्रा पोलीस स्टेशन),श्री.गीताराम शेवाळे(पोलीस निरीक्षक,गुन्हे),श्रीमती.माधुरी जाधव(पोलीस निरीक्षक ,प्रशासन ),मुब्रा पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मा.शहाजी शेळके,पो.ह/684/ सुभाष मोरे,पो.ना/6196/अनिल मोरे,पो.2809/लीलाधर सोळुंखे,पो.ना.2572/जयेश तमोरे,पो.ना.7058 योगेश पाटील सर्व नेमणूक मुंब्रा पोलीस ठाणे यांनी केली आहे.