बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अनधिकृत”ला पाठीशी घालणाऱ्यांचा सन्मान; कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा अवमान’….

अमित जाधव-संपादक

 

‘अनधिकृत”ला पाठीशी घालणाऱ्यांचा सन्मान; कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा अवमान’*

ठाणे महापालिकेत सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्त हे एकत्रितपणे मनमानी कारभार करत असून सर्व प्रकारच्या अनधिकृत -अवैध आणि अनियमित गोष्टींना पाठीशी घालत आहे. नुकत्याच झालेल्या बढती आणि बदल्यांमध्ये अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला असून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा अवमान करण्यात आल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे.

नुकतेच अतिक्रमण विभागात वादग्रस्त अधिकाऱ्याची नेमणूक करून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना एकप्रकारे पाठबळ देण्याचे काम आयुक्त आणि सत्ताधारी मिळून करत असल्याचा थेट आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे.

ठाणे हे सांस्कृतिक शहर असून या शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. अनधिकृत बांधकामांचे शहर असा उल्लेख ठाणेकर कदापि सहन करणार नाहीत. आयुक्तांचा बोलविता धनी कोण आहे? महेश आहेर यांच्या बाबत सफाई कामगारांपासून अनधिकृत बांधकामांविरुद्ध तक्रारी करणाऱ्या अनेक नागरिकांचे आक्षेप असूनही त्यांची नियुक्ती अतिक्रमण विभागात आकाराने संतापजनक आहे. याबाबत कोणती गोल्डन गॅंग कार्यरत आहे याचा भांडाफोड योग्य वेळी केला जाईल तसेच पुढील काळात वॉर अंगेंस्ट इल्लीगल कन्स्ट्रक्शन ही मोहीम लोकसहभागातून सुरू केली जाईल असा इशारा आमदार संजय केळकर यांनी केला आहे. तसेच ही नियुक्ती आयुक्तांनी रद्द करावी,
*अशी मागणी आमदार श्री. संजय केळकर यांनी केली आहे.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे